Menu Close

मालदा (बंगाल) येथील अदीना मशीद हिंदूंचे मंदिर तोडून बांधण्यात आल्याने हिंदूंना तेथे पूजा करण्याची अनुमती द्या- अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्र लिहून मागणी !

मुळात आता अशी मागणी करू लागू नये. देशात ज्या ठिकाणी मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्याचा इतिहास आणि पुरावे आहेत, ते पुरातत्व विभागाने सरकारला सादर करावेत आणि सरकारने अशी सर्व ठिकाणी हिंदूंच्या कह्यात द्यावी ! -संपादक 

ज्येष्ठ अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन व अदीना मशीदीवरील हिंदू प्रतीके

नवी देहली – बंगालच्या मालदा जिल्ह्यातील ‘अदीना’ मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते. शेकडो वर्षांपूर्वी येथील मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली आहे. तेथे अजूनही मंदिरांचे अवशेष दिसून येतात. आता ही भूमी पुन्हा हिंदूंना मिळावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांनी केली आहे. ही जागा सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे पू. हरि शंकर जैन यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना पत्र लिहून ‘या तथाकथित मशिदीमध्ये हिंदूंना पूजेचा मान मिळाला पाहिजे’, अशी मागणी केली आहे. तसेच पू. जैन यांनी देशभरातील हिंदूंना यासाठी पुढे येण्याचे आवाहनही केले आहे.

सिकंदर शाह नामक आक्रमणकर्त्याने वर्ष १३६४-७४ च्या कालखंडात हिंदु मंदिर तोडून त्याठिकाणी अदीना मशीद बांधली होती. मंदिराचे अवशेष येथे मिळाले असून एकूण ३२ पुरावे आहेत जे याठिकाणी मंदिर असल्याची निश्‍चिती देतात.

https://www.facebook.com/templescience/posts/1376959562345413?ref=embed_post

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *