बिहारमध्ये ‘लव्ह जिहाद’ चे नवीन प्रकरण उजेडात !
कैमूर (बिहार) – बिहारच्या सासाराम जिल्ह्यातील कैमूर येथील एका २१ वर्षीय हिंदु मुलीने शफीक अन्सारीशी मैत्री केली. शफीक अन्सारीच्या प्रेमात ती आकंड बुडाली होती. याचा अपलाभ उठवत शफीक अन्सारीने तिच्यावर बलात्कार करून तिची चाकूने वार करून हत्या केली.
बिहार पोलिसांनी भ्रमणभाषमधील पुराव्याच्या आधारे शफीक अन्सारीला अटक केली असता त्याने १८ फेब्रुवारी या दिवशी हिंदु प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह डोंगराच्या झाडीत लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह कह्यात घेतला असून, तिथून एक चाकूही हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
Tragic incident of ‘Love J!h@d’ has come to light in Bihar.
Shafiq Ansari raped and killed his Hindu girlfriend.
👉 It’s an unfortunate fact to accept that no Government can stop Love J!h@d, it can only be stopped by the establishment of #HinduRashtra pic.twitter.com/YnHHT9SI4D
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 11, 2024
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कैमूर जिल्ह्यातील भभुआ पोलीस ठाण्याच्या परिसरातील कुद्रा येथे रहाणारी हिंदु तरुणी भभुआ येथे आली होती. १७ फेब्रुवारी या दिवशी तिच्या चुलत बहिणीची दहावीची परीक्षा असल्याने ती येथे आली होती; मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. सासाराम येथील एका भाड्याच्या घरात ती शफीक अन्सारी याच्यासमवेत रात्रभर राहिली. तेथे शफीकने तिच्यावर बलात्कार केला. दुसर्या दिवशी शफीक तिला रोहतास येथील मांढर कुंडाच्या जंगलात घेऊन गेला. त्याने तिला सफरचंद खाऊ घालण्याच्या निमित्ताने चाकूही विकत घेतला आणि संधी मिळताच त्याच चाकूने तिच्यावर वार करून तिची हत्या केली.