बेकायदेशीर बांधकामे होत असतांना प्रशासन झोपलेले असते का ? -संपादक
कर्णावती (गुजरात) – गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांत बेकायदेशीर दर्गे आणि मदरसे यांच्यावर कारवाई करून ते पाडण्यात आले.
१२ मार्चला कच्छमधील अंजार येथील सरकारी भूमीवर बांधलेले हाजीपीर दर्गा, नागेशापीर दर्गा आणि वल्लीपीर दर्गा हे ३ दर्गे बुलडोझरद्वारे पाडण्यात आले. प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली. कारवाईपूर्वी सर्व बेकायदा बांधकामांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई झाली.
काही दिवसांपूर्वी जुनागड येथील माजेवाडी गेटजवळील दर्गा पाडण्यात आला होता. कच्छमधील खवरा भागात ३ बेकायदेशीर मदरसे पाडण्यात आले होते. ११ मार्चला कच्छमधील अब्दासा येथील २ बेकायदेशीर दर्ग्यांवर बुलडोझर चालवण्यात आला होता.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात