पालकांच्या तक्रारीनंतर परीक्षा केंद्र प्रशासक आणि मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)
भरूच (गुजरात)- अंकलेश्वर येथील खासगी ‘लायन्स स्कूल’मध्ये १३ मार्चला इयत्ता १० वीची गणिताची परीक्षा चालू होण्यापूर्वी काही मुसलमान विद्यार्थिनींना परीक्षा केंद्राच्या प्रभारी प्रशासकाने हिजाब हटवण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे. या आरोपानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने परीक्षा केंद्राचे प्रशासक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका इलाबेन सुरतिया यांना हटवण्याचा आदेश दिला. नियमानुसार विद्यार्थी ज्या वर्गात परीक्षा देतात, तेथे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पाहिले असता र २ मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब काढण्यास सांगितले जात असल्याचे दिसत आहे.
‘विद्यार्थ्यांच्या वेशभूषेविषयी कोणताही विशिष्ट नियम नसून ते कोणत्याही योग्य वेशभूषेत परीक्षा देऊ शकतात’, असे गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.