दुकानात हनुमान चालिसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणावर चाकूद्वारे आक्रमण March 19, 2024 Share On : बेंगळूरू (कर्नाटक) येथे मुसलमानबहुल भागातील घटना ! मुकेश नावाच्या हिंदु तरुणावर आक्रमण बेंगळुरू (कर्नाटक) – येथील नगरथपेटे येथील जुम्मा मशीद मार्गावर हिंदूंच्या मालकीचे भ्रमणभाष संचांच्या विक्रीचे दुकान आहे. या दुकानात कथित अजानच्या (नमाजपठणासाठी मशिदीत बोलावण्याच्या आवाहनाच्या) वेळी हनुमान चालिसा लावल्यावरून काही मुसलमान तरुणांनी दुकानातील मुकेश नावाच्या हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण केले. यात घायाळ झाल्याने मुकेश याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ६ तरुणांवर गुन्हा नोंदवला असून यातील ३ जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे. या आक्रमणाच्या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. A Hindu man named Mukesh attacked by a Muslim mob at his mobile shop in Nagarthpet, Bangalore, for allegedly playing the Hanuman Chalisa! Mainstream media/people like Zubair won’t show you this! 👇pic.twitter.com/CMrN6crg8n — Ashwini Shrivastava (@AshwiniSahaya) March 18, 2024 वर्गणी देत नसल्याचा सूड घेण्यासाठी आक्रमण केल्याचा आरोप घटनेविषयी मुकेश म्हणाला की, ६ जण दुकानात आले होते. ‘ते कोण ?’, ‘त्यांची नावे काय ?’, याविषयी मला काहीच ठाऊक नाही. मी संध्याकाळी ६ वाजता भजने लावत होतो, तेव्हा ते आले आणि म्हणाले, ‘‘आम्हाला त्रास होत आहे. ही गाणी थांबव.’’ त्यानंतर वाद होऊन त्यांनी माझ्यावर आक्रमण केले. या आधी त्यांचा आणि माझा काहीच परिचय नाही. ते वर्गणी गोळा करण्यासाठी अधून मधून दुकानात येत असत. मी वर्गणी देत नसे. भ्रमणभाषचे दुकान असल्याने ब्लूटूथ, हेडफोन मागण्यासाठी ते येत असत. मी कधीही काहीच दिले नाही. तोच राग मनात ठेवून सूड घेण्याच्या उद्देशाने त्यांनी मारहाण केली. सर्व माहिती आणि सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडे दिले आहे. मला कन्नड वाचता येत नाही. प्रथम माहिती अहवालात (एफ्.आय.आर.मध्ये) काय लिहिले, ते ठाऊक नाही. ‘पोलिसांनी त्यांना हवे ते लिहिले असेल’, असा संशय मुकेश याने व्यक्त केला . आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन करण्यात येईल ! – व्यापार्यांची चेतावणी मारहाणीच्या घटनेनंतर येथील हलसुरू गेट पोलीस ठाण्यासमोर अनेक दुकानदार गोळा झाले. आक्रमण करणार्या गुडांना तात्काळ अटक करण्यात यावी. १८ मार्चच्या संध्याकाळपर्यंत त्यांना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी व्यापार्यांनी दिली आहे. विहिंप आणि भाजप यांच्याकडून काँग्रेस सरकारवर टीका ! विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी म्हटले की, सुलेमान, शाहनवाज आणि दानिश यांच्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता; परंतु अद्याप त्यांना अटक झाल्याची बातमी नाही. क्या कर्नाटक में अब हनुमान चालीसा भी प्रतिबंधित हो गया? Jumma maseedhi Road, Siddannagalli नागरपेट, बैंगलुरु के मुकेश से इस्लामिक जिहादियों ने सिर्फ इसलिए मारपीट की क्योंकि वह अपनी मोबाईल की दुकान पर बैठा हनुमान चालीसा सुन रहा था। सुलेमान, शाहनवाज व दानिश सहित 6 लोगों के विरूद्ध… pic.twitter.com/KEOqiGCkG5 — विनोद बंसल Vinod Bansal (@vinod_bansal) March 18, 2024 केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल म्हणाले की, कर्नाटकमध्ये हनुमान चालीसावर बंदी घालण्यात आली आहे का ? राज्याच्या विधानसभेतील पाकिस्तान झिंदाबाद घोषणांपासून ते रामेश्वरम कॅफेच्या स्फोटापर्यंत, हे बेंगळुरूमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात काँग्रेस सरकारचे अपयश अधोरेखित करते, ज्यामुळे देशविरोधी घटकांना प्रोत्साहन मिळते. Incident in a Mu$|!m-dominated area in Bengaluru (Karnataka). Hindu youth assaulted with a knife by fanatical Mu$|!m$ for playing Hanuman Chalisa in his own shop. 👉 The increasing atrocities that Hindus are facing in Karnataka, are a direct consequence of Congress being in… pic.twitter.com/m8GvW4PyJA — Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 18, 2024 Tags : गुन्हेगारीधर्मांधबहुचर्चित विषयराष्ट्रीयहिंदूंवर आक्रमणRelated Newsबांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांवर कडक कारवाई करून त्यांना मतदान प्रक्रियेपासून रोखावे ! November 21, 2024आम्ही भारताची स्थिती बांगलादेशासारखी होऊ देणार नाही ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री November 21, 2024अमेरिकेने बांगलादेशावर आर्थिक निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक प्रयत्नशील ! November 21, 2024 Please enter followup Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Followup Date*Contacted By*Contact Status*Contacted on phoneContacted personally visitingContacted by other meansNot taking phone / phone switched offTold will call later and not responding after thatPhone no given is wrong / not existingSince they are in foreign countries, cannot call; and not responding to mailboxesSince not taking phone, contacted through mail, but no response alsoCould not contact properly due to network congestion, low volumeMeeting DateMeeting Time (Enter in 24 hour format only)Contact ResponsePendingSample Response 1Sample Response 2Status of Participation
बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांवर कडक कारवाई करून त्यांना मतदान प्रक्रियेपासून रोखावे ! November 21, 2024
आम्ही भारताची स्थिती बांगलादेशासारखी होऊ देणार नाही ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री November 21, 2024
अमेरिकेने बांगलादेशावर आर्थिक निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरिक प्रयत्नशील ! November 21, 2024