हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या कृष्णकूपची पूजा करण्याची मिळाली अनुमती ! March 20, 2024 Share On : हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्वर भृगुवंशी आशुतोष पांडेय मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह मशिदीजवळील कृष्णकूपची (विहिरीची) पूजा करण्याची अनुमती हिंदूंना मिळाली आहे. याची माहिती मुख्य हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्वर भृगुवंशी आशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली. Hindus granted permission to worship at Krishnakup (Krishna Well) on Shri Krishna Janmabhoomi.#Mathura (Uttar Pradesh) – Hindus have been granted permission to worship at the Krishnakup, located near the Eidgah Mosque on Shri Krishna Janmabhoomi. This information was provided… pic.twitter.com/46qdMveRQB — Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 19, 2024 ९ मार्च या दिवशी पांडेय यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मागणी केली होती की, परंपरागत पद्धतीने शीतला अष्टमीच्या दिवशी तेथील कृष्णकूपची पूजा करण्याची हिंदु महिलांना अनुमती मिळावी, तसेच तेथे मुसलमानांकडून कोणताही विरोध होऊ नये, याची व्यवस्था करावी. यानंतर मुख्य सचिवांनी वरिष्ठ पोलीस आयुक्तांना संबंधित विषयाचे परीक्षण करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यावर आयुक्तांनी हिंदूंना पूजा करता येण्यासाठी व्यवस्था केली असून पूजा करण्याची अनुमती दिली आहे. Tags : राष्ट्रीयश्रीकृष्णजन्मभूमीRelated Newsदेशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून पुणे येथे आंदोलन December 4, 2024‘बांगलादेशी रुग्णांवर उपचार करणार नाही – जे.एन्. रे रुग्णालय, कोलकाता December 3, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून पुणे येथे आंदोलन December 4, 2024