Menu Close

शिरगाव गड (पालघर) येथे हिंदु जनजागृती समितीची ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

प्रातिनिधिक छायाचित्र

पालघर – येथील शिरगाव गडावर हिंदु जनजागृती समितीचा स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षण वर्ग यांतील धर्मप्रेमी युवक-युवतींसाठी गड संवर्धन मोहीम राबवण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने मावळ्यांनी हा गड पोर्तुगीजांकडून मिळवला होता. आरंभी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गडाची स्वच्छता करण्यात आली. या वेळी गडावरील पालापाचोळा, प्लास्टिकचा कचरा उचलण्यात आला. उपस्थित सर्वांना गडाची माहिती देण्यात आली. श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात आला. नंतर उपस्थित युवक-युवतींनी मावळ्यांचे शौर्यप्रसंग कथन केले. त्यामुळे सर्वांमध्ये उत्साह निर्माण झाला. ‘धर्म आणि राष्ट्र यांवर आलेले संकट पहाता हिंदु राष्ट्र का आवश्यक आहे ?’ या विषयावर सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी गडावर शौर्य जागृती करणारे प्रशिक्षण करून सामूहिक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. युवक-युवती आणि पालक मिळून ३९ जण या मोहिमेत सहभागी झाले होते.

मोहिमेत सहभागी युवक-युवती

साहाय्य

स्थानिक शिवप्रेमी श्री. चिराग ठाकूर यांनी स्वच्छता साहित्य दिले, तर सातपाटी येथील श्री. नागेश मेहेर, श्री. केतन चांबरे यांनी न्याहारी आणि पाणी यांची व्यवस्था केली.

स्वसंरक्षण प्रशिक्षण करतांना युवक-युवती

अभिप्राय

१. सौ. निधी कुबल – नामजप करतांना आलेला अनुभव अगदी हृदयस्पर्शी होता. ‘समितीचे कार्य अगदी सगळीकडे आहे’, हे ऐकले होते, आज पाहिलेही. त्यामुळे ‘आपण एकटे नाही. आपल्यासमवेत अनेक आहेत, ज्यांना आपले हिंदु राष्ट्र टिकवून ठेवायचे आहे. काही जण आपल्या पुढच्या पिढीला घडवत आहेत’, हेही कळले.

सामूहिक नामजप करतांना युवक-युवती

२. श्री. प्रीत पांडे – ‘नामजप करतांना बाहेरून येणार्‍या गाण्यांचा आवाज ऐकू आला नाही’, ही अनुभूती सर्वांना घेता आली.

३. सौ. हर्षदा टकले – जिज्ञासूंपर्यंत पोचून त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करता यावेत, यासाठी धर्मशिक्षणवर्गाची पुष्कळ आवश्यकता आहे.

स्वच्छता करतांना युवक-युवती

४. सौ. आशा शेडगे – आजची परिस्थिती पालटण्यासाठी चाललेले सनातनचे हे प्रयत्न पुष्कळ स्तुत्य आहेत.

५. श्री. संतोष शेडगे – या उपक्रमातून साधकांमधील संघटन, नियोजन, प्रेमभाव यांसारखे गुण शिकता आले. समाजात या प्रकारच्या कार्यक्रमांद्वारे जागृती व्हायला हवी. लोकांपर्यंत हे सर्व पोचले पाहिजे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *