Menu Close

वफ्फबोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !

कोणत्याही देशात मुसलमान जेव्हा अल्पसंख्य असतात, तेव्हा ते नेहमी ‘आम्ही या देशात असुरक्षित आहोत’, अशी धादांत खोटी ओरड करतात. या मुसलमानांना कितीही पैसा, प्रतिष्ठा आणि पदे दिली, तरी त्यांची असुरक्षिततेची ओरड काही संपत नाही. अमाप पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळूनही ‘खान’ आडनावाच्या चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना आणि त्यांच्या हिंदु बायकांना हा भारत ‘असुरक्षित’ वाटू लागतो ! मुळात कोणत्याही भूभागात मुसलमान अल्पसंख्य असला, तरी तो कधीच असुरक्षित नसतो. उलट त्याच्या जिहादी वृत्ती आणि कृती यांमुळे इतर बहुसंख्य असणारा अन्य धर्मीय समाज कायमच असुरक्षित असतो. आज जिहादी वृत्तीच्या मुसलमांनामुळे सारी मानवजात असुरक्षित झाली आहे. या जिहादी मुसलमांनामुळे तिसरे महायुद्ध भडकण्याची आणि त्यात सारी मानवजात भस्म होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

हमीद अन्सारी

१. १० वर्षे भारताचे उपराष्ट्रपतीपद भोगूनही हिंदुद्वेषी गरळओक करणारे हमीद अन्सारी !

हमीद अन्सारी यांनी १० वर्षे भारताचे उपराष्ट्रपती पद मनसोक्त उपभोगले, अनेक देशद्रोही कारवाया केल्या; पण जेव्हा हिंदुत्वनिष्ठ विचारांचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, केंद्रात आणि अनेक राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार सत्तारूढ झाले, इतके दिवस दबून रहावे लागणारा हिंदु समाज जागृत होऊन आपल्यावरील अन्याविरुद्ध आवाज उठवू लागला; तेव्हा मात्र या हमीद अन्सारींच्या पोटातील विष ओठावर आले आणि त्यांनी गरळ ओकली. ते म्हणाले, ‘‘भारत हा देश मुसलमानांना रहाण्यालायक राहिला नाही.’’ पदावर असेपर्यंत त्या पदाचे सर्व लाभ, सुविधा घ्यायच्या; पण पदच्युत होताच मात्र ‘खाल्ल्या मिठाला न जागता’ देशाविरुद्ध गरळ ओकायची, याला ‘नमक हरामी’ नाही, तर अन्य काय म्हणावे ?

२. अल्पसंख्य जिहादी बहुसंख्य झाले की, वेगळ्या भूभागाची मागणी करतात !

जिहादी मुसलमांनाचे अजून एक वैशिष्ट्य, म्हणजे ही जमात कधीच आणि कोणत्याच देशात संतुष्ट नसते. त्यांना रक्तपात आणि विध्वंस केल्याविना चैन पडत नाही. हे जिहादी वृत्तीचे मुसलमान अल्पसंख्येत असतात, तेव्हा क्षुल्लक कारणावरूनही दंगेधोपे करतात, जाळपोळ करून अन्य धर्मियांचे जीवित आणि वित्त यांची हानी करतात. जेव्हा बहुसंख्य होतात, तेव्हा आपल्या धर्मियांसाठी वेगळ्या भूभागाची मागणी करतात. देशाचे तुकडे पाडतात.

३. वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानची मागणी होणे आणि विस्थापनात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होणे !

वर्ष १९४७ मध्ये भारताच्या संदर्भात असेच घडले. जेव्हा सिंध, पूर्व पंजाब आणि पूर्व बंगालमध्ये मुसलमानांची संख्या हिंदूंपेक्षा अधिक वाढली, तेव्हा त्यांनी पाकिस्तानची मागणी केली. यासाठी जिहादी मुसलमानांनी अभूतपूर्व असा हिंसाचार आणि हिंदूंचा नरसंहार केला. लाखो हिंदु स्त्री-पुरुष आणि लहान मुले यांची निर्दयीपणे कत्तल केली. १० लाख हिंदू विस्थापित झाले. सहस्रो हिंदु स्त्रिया, मुली जिहादी मुसलमानांच्या अमानुष बलात्कारात अडकल्या. फाळणीच्या कथा ऐकणे, पहाणे किंवा वाचणेही असह्य व्हावे, एवढ्या त्या अमानुष कृत्यांनी बरबटलेल्या आहेत.

४. पाकमध्ये गेलेल्या मुसलमानांची संपत्ती मुसलमानांनाच मिळण्यासाठी ‘वफ्फ बोर्डा’ची स्थापना !

भारताच्या या अनैसर्गिक फाळणीच्या वेळेस लाखो हिंदू पाकिस्तानातून भारतात आश्रयासाठी आले, तर भारतातील लाखो मुसलमान ‘आपला देश’ म्हणून पाकिस्तानात गेले. पाकिस्तानमधून जे हिंदू भारतात आले त्यांच्या पाकिस्तानमधील भूमी, घरे तेथील सरकारने भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या मुसलमानांच्या स्वाधीन केल्या; पण भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या मुसलमानांच्या भूमी आणि घरे येथील हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी पाकिस्तानमधून विस्थापित झालेल्या हिंदूंच्या मात्र स्वाधीन केल्या नाहीत. मग या मुसलमानांच्या भूमीचे आणि घरांचे करायचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा भारतातील सत्तारूढ असलेल्या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी भारतातील मुसलमानांच्या भूमी आणि घरे भारतात राहिलेल्या मुसलमानांनाच मिळाव्यात; म्हणून ‘वफ्फ बोर्डा’ची स्थापना केली अन् भारतातील मुसलमानांची पूर्ण संपत्ती त्या वफ्फ बोर्डाच्या स्वाधीन केली.

श्री. शंकर गो. पांडे

५. हिंदुद्वेष्ट्या नेत्यांकडून मुसलमान हिताचे निर्णय !

मुसलमानांच्या संपत्तीची विल्हेवाट कशी लावायची ? याचे पूर्ण अधिकार वफ्फ बोर्डाला दिले. खरे तर मुसलमानांनी भारतात सोडलेल्या संपत्तीचे वाटप एक तर विस्थापित हिंदूंमध्ये करता आले असते किंवा शत्रूची संपत्ती म्हणून ती सरकारजमा करता आली असती; पण भारताच्या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी हिंदूंच्या हिताचा निर्णय न घेता तो मुसलमानांचे हित लक्षात घेऊन घेतला. हा निर्णय घेतांना हे हिंदुद्वेष्टे नेते फाळणीमुळे हिंदु समाजाच्या शरिरावर आणि मनावर नुकत्याच झालेल्या जखमा अल्पकाळातच पूर्णपणे विसरले.

६. कायद्याविषयीची माहिती हिंदूंनी वाचल्यास ते चक्रावून गेल्याविना रहाणार नाहीत !

वक्फ बोर्डाच्या कायद्याला आव्हान देणार्‍या १२० जनहित याचिका देहली उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) झाल्या आहेत. प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनीही एक जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. यावर देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी या जनहित याचिकेवर अंतिम सुनावणी होणार होती. ती सुनावणी झाली कि नाही ? हे अद्याप समजले नाही. या वक्फ बोर्ड कायद्याची माहिती जेव्हा अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितली, तेव्हा तर मी चक्रावून गेलो. या अमानुष कायद्याविषयीची माहिती जेव्हा हिंदु समाज वाचेल, तेव्हा तोही चक्रावून गेल्याविना रहाणार नाही आणि हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी हिंदूंचा नाश करण्यासाठी अन् या राष्ट्राला ‘मुसलमान देश’ बनवण्यासाठी कसे षड्यंत्र रचले आहे, या सत्याची त्यांना प्रचीती येईल.

७. वक्फ बोर्डाला अमर्याद आणि निरंकुश अधिकार !

या कायद्याद्वारे हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी वक्फ बोर्डाला एवढे अमर्यादित आणि निरंकुश अधिकार दिले आहेत की, वक्फ बोर्ड भारतातील कोणत्याही मोकळ्या भूमीवर, हिंदूंची घरे, दुकाने, व्यवसाय असणार्‍या भूमीवर, हिंदूंची मंदिरे आणि धार्मिक स्थळे ज्या जागेवर आहेत, त्या जागेवर वक्फ बोर्डाचा हक्क सांगून त्या भूमीचा ताबा वक्फ बोर्डाकडे द्यावा, असे सांगू शकतो. विशेष म्हणजे वक्फ बोर्डाने हिंदूंच्या एखाद्या भूमीवर वक्फ बोर्डाचा अधिकार आहे, असा दावा केला, तर ‘ती भूमी वक्फ बोर्डाची नसून माझी आहे’, हे सिद्ध करण्याचे संपूर्ण दायित्व हे केवळ त्या हिंदूंचे असते !

८. वक्फने बळकावलेल्या भूमीविरुद्ध हिंदूंना कोणत्याही न्यायालयात जाता न येणे !

या कायद्यात असेही एक प्रावधान (तरतूद) करण्यात आले आहे की, हिंदूंना वक्फ बोर्डाने त्यांच्या भूमीवर सांगितलेला अधिकार नाकारायचा असेल, तर त्याला वक्फ बोर्डाच्या विरुद्ध भारतातील कोणत्याही न्यायालयात दावा प्रविष्ट करता येणार नाही, तर यासाठी त्याला या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी वक्फ बोर्डाची जी समिती आहे, त्या समितीसमोर पुराव्यासाठी जी कागदपत्रे लागतात, ती घेऊन जावे लागेल. उद्या वक्फ बोर्डाने ‘सर्वाेच्च न्यायालयाची इमारत ज्या जागेवर उभी आहे, ती जागा ही आमचीच आहे’, अशी मागणी केली, तर सर्वाेच्च न्यायालयालाही न्याय मागण्यासाठी वक्फ बोर्डाकडेच अपील करावे लागेल. या वक्फ बोर्डातील प्रावधानाप्रमाणे वक्फ बोर्ड राष्ट्रपती भवन किंवा त्या भवनातील अमृत उद्यान यांवरही अधिकार सांगू शकतो. माकडाच्या हातात कोलीत दिल्यानंतर तो जसा सगळीकडे आग लावत सुटतो, त्याप्रमाणे वक्फ बोर्डाला हिंदूंच्या भूमी लुटण्याचे जे अमर्याद अधिकार दिले आहेत त्या अधिकाराप्रमाणे वक्फ बोर्डाने भारतातील भूमी बळकावण्याचा सपाटा लावला आहे.

९. ‘एंटिलिया’वरही अधिकार सांगणारे वक्फ बोर्ड !

भारतातीलच नव्हे, तर जगातील एक श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुंबई येथे ‘एंटिलिया’ नावाचे ७ मजली निवासस्थान बांधले आहे. हे निवास अत्यंत वैभवशाली आणि सर्व आधुनिक सुखसुविधांनी युक्त आहे. ही इमारत कोणत्याही शक्तीशाली भूकंप किंवा बाँबस्फोट यांनी उद्ध्वस्त होणार नाही, एवढी मजबूत आहे; पण कोट्यवधींचे मूल्य असणारी ही इमारत ज्या जागेवर आहे, त्या जागेवर वक्फ बोर्डाने त्याचा अधिकार सांगितला आहे !

१०. ‘आप’चे नेते केजरीवालांचा वक्फ बोर्डला पाठिंबा आणि ‘एंटिलिया’ उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न !

विशेष म्हणजे देहलीचे हिंदुद्वेष्टे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वक्फ बोर्डाच्या ‘एंटिलिया’च्या भूमीच्या मागणीला त्यांनी त्यांचा पाठिंबा घोषित केला आहे. एवढेच नव्हे, तर वाह्यात आणि देशविरोधी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असणारे हे केजरीवाल मुसलमानांच्या एका सभेला संबोधित करतांना बरळले, ‘माझे सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ झाले, तर मी मुकेश अंबानी याचे ‘एंटीलिया’ हे निवासस्थान बुलडोझरने भुईसपाट करीन !’ सध्या या देशात अशा ‘जयचंद’च्या औलादीचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. (क्रमशः पुढच्या रविवारी)

श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *