प्राचीन हिंदु धर्मावर चिखलफेक करणार्यांना सणसणीत चपराक !
कानपूर (उत्तरप्रदेश) : घाटपूरजवळील बेहाता येथे असलेल्या भगवान श्री जगन्नाथ मंदिरावर पडणार्या पावसाच्या थेंबाच्या आकारावरून ‘पावसाळा कसा जाईल’, याविषयी अंदाज व्यक्त केला जातो. मंदिराच्या आगाशीमध्ये पाणी साठवून हे भविष्य वर्तवले जाते. गत १०० वर्षांपासून हे मंदिर ‘रेन टेम्पल’ या नावाने ओळखले जाते.
मंदिरावर पडणार्या पावसाच्या पाण्याच्या थेंबाचा आकार मोठा असल्यास चांगला पाऊस पडेल आणि थेंबाचा आकारा पुष्कळ लहान असल्यास दुष्काळ पडू शकतो, असे समजले जाते. अशा प्रकारे वर्तवलेला अंदाज समजून घेण्यासाठी अनेक संशोधन पथके आणि शास्त्रज्ञ येथे आले होते; मात्र कोणतेही निष्कर्ष समोर आलेले नाहीत.
भगवान श्री जगन्नाथ मंदिराचे मुख्य पुजारी के.पी. शुक्ला म्हणाले, ‘‘या मंदिराची सुंदर कलाकृती ही एकमेव आहे. संपूर्ण राज्यामध्ये अशा तर्हेची कलाकृती असलेले दुसरे कुठलेच मंदिर नही. सम्राट अशोकाच्या काळामध्ये देशाच्या विविध भागांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या स्तूपाप्रमाणे हे मंदिर बनवले आहे. या मंदिरामध्ये आमची ७ वी पिढी पूजा करत आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात