हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकातील गजेंद्रगडाची स्वच्छता March 29, 2024 Share On : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘एक दिवस शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ अभियान ! गजेंद्रगडाची स्वच्छता करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते गजेंद्रगड (कर्नाटक) – उद्या, २८ मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटक, तसेच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात ‘एक दिवस शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ हे अभियान राबण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अथवा त्यांच्या काळातील गडांना भेट देऊन तेथे सामूहिक स्वच्छता केली जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या येथील गदग येथील गजेंद्रगडाची समितीच्या कार्यकर्त्यांकडून स्वच्छता केली. 🚩’Ek Din Shivaji Maharaj ke Sannidhya Mein’ campaign on occasion of #ChhatrapatiShivajiMaharaj Jayanti ! ‘Shourya Jagruti Abhiyan’ and cleanliness drive taken up at the Gajendragad Fort, Gadag Dt. by @HinduJagrutiOrg 🎥 Watch special short film :https://t.co/BxtZcUsPFf pic.twitter.com/D2b77Vgce6 — HJS Karnataka (@HJSKarnataka) March 26, 2024 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राची पूजा करण्यात आली. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आदर्श राष्ट्र निर्मितीसाठी आम्हाला बळ मिळू दे’, अशी भावपूर्ण प्रार्थना केल्यावर चित्राच्या वरून एक फुल खाली पडले. ‘हा सर्वांच्या प्रार्थनेला प्रसाद मिळाला’, असा भाव सर्वांमध्ये निर्माण झाला. सर्वांनी एकत्रितपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतली. Tags : Hindu Janajagruti Samitiउपक्रमराष्ट्रीयRelated Newsमंदिरांच्या शेतजमिनी बळकावल्या जाऊ नयेत, म्हणून ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ करण्यासंदर्भात कार्यवाही करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन December 20, 2024पटियाला न्यायालयाने दिले दिल्ली आर्ट गॅलरीच्या सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश December 19, 2024महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुत्ववाद्यांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर कार्यक्रमाचे आयोजन December 17, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
मंदिरांच्या शेतजमिनी बळकावल्या जाऊ नयेत, म्हणून ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ करण्यासंदर्भात कार्यवाही करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन December 20, 2024
पटियाला न्यायालयाने दिले दिल्ली आर्ट गॅलरीच्या सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश December 19, 2024
महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुत्ववाद्यांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर कार्यक्रमाचे आयोजन December 17, 2024