बांगलादेशी घुसखोरांची समस्या समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत -संपादक
नवी मुंबई (महाराष्ट्र) – येथील घणसोली भागातील जनाई कंपाऊंड आणि शिवाजी तलावाजवळ धाड घालून आतंकवादविरोधी पथकाने ५ घुसखोर बांगलादेशींना कह्यात घेतले. ३० मार्च या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
जमाल शेख (वय २२ वर्षे), रेबुल समद शेख (वय ४० वर्षे), रोनी सोरिफुल खान (वय २५ वर्षे), जुलू बिलाल शरीफ (वय २८ वर्षे) आणि महंमद मुनीर महंमद सिराज मुल्ला (वय ४९ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. या सर्वांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मागील वर्षीही आतंकवादविरोधी पथकाने नवी मुंबईमध्ये ९ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती. त्यामधील ३ जण बलात्काराच्या गुन्ह्यामधील पलायन केलेले आरोपी होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात