- ६७ गुन्हे नोंद असणारा, २ आमदारांच्या हत्येच्या प्रकरणी शिक्षा झालेला, जन्मठेप भोगत असलेला गुंड मेल्यावर त्याच्या अंत्यसंस्काराला ३० सहस्र मुसलमान उपस्थित रहातात, याचा विचार ढोंगी निधर्मीवादी करणार नाहीत, हे लक्षात घ्या !
- मुंबईतील वर्ष १९९३ च्या बाँबस्फोटातील सूत्रधार याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर त्याच्या मृतदेहाच्या अंत्ययात्रेतही २० सहस्रांहून अधिक मुसलमान सहभागी झाले होते. यातून असे लोक कोणत्या मानसिकतेची आहेत, यावर चर्चा होणे आता आवश्यक झाले आहे ! -संपादक
गाझीपूर (उत्तरप्रदेश) – कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याच्या मृतदेहावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील कालीबाग कब्रस्तानात अन्सारी याचा मृतदेह पुरण्यात आला. या वेळी केवळ त्याच्या कुटुंबियांनाच उपस्थित रहाण्याची अनुमती देण्यात आली होती. त्याच्या अंत्ययात्रेत आणि कब्रस्तानाबाहेर ३० सहस्रांहून अधिक मुसलमान उपस्थित होते. गुंड अन्सारी याला राज्यातील बांदा येथील कारागृहात असतांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आल्यावर तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. अन्सारीला विष देऊन मारण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आला असला, तरी शवविच्छेदनाच्या अहवालानुसार त्याला मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीही करण्यात येत आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात