Menu Close

बंगाल : प्रा. अब्दुल्ला मोल्ला यांच्यावर परीक्षेत उत्तीर्ण करण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोप

  • कोलकाता येथील ‘विश्‍वभारती विद्यापिठा’तील घटना !

  • पोलिसांनी नोंदवला गुन्हा !

संदेशखाली प्रकरणाविषयी बंगाल पोलिसांची भूमिका संपूर्ण जगाने पाहिली. त्यामुळे आता या प्रकरणीही तृणमूल काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली असली, तरी पुढे काहीच केले गेले नाही, तर आश्‍चर्य वाटू नये ! -संपादक 

(प्रतिकात्मक चित्र)

कोलकाता (बंगाल) – येथील शांतीनिकेतनच्या विश्‍वभारती विद्यापिठातील परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी केल्यावरून ३ विद्यार्थिनींनी अब्दुल्ला मोल्ला या अतिथी प्राध्यापकाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. पोलिसांनी या गंभीर प्रकरणी गुन्हा नोंदवला. प्रा. अब्दुल्ला यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे.

१. विद्यापिठाच्या ‘पर्शियन, उर्दू अँड इस्लामिक स्टडीज’ या विभागात या विद्यार्थिनी शिकतात. त्यांनी आरोप केला आहे की, प्रा. अब्दुल्ला मोल्ला यांनी त्यांना व्हॉट्सपवर अश्‍लील संदेशही पाठवले आणि अनेक वेळा अयोग्यरित्या स्पर्श केला.

२. प्रा. मोल्ला यांनी विद्यार्थिनींचा आरोप फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, मला याविषयी काहीच ठाऊक नाही. मला फसवले जात आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला व्हॉट्सपवर कोणताही संदेश पाठवला असेल, तर तो अभ्यासाशी संबंधित आहे. त्याचा इतर कुणाशीही संबंध नाही. इतके दिवस मी येथे शिकवत आहे. माझ्यावर यापूर्वी कधीही असे आरोप झाले नाहीत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *