Menu Close

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतरासाठी चर्चमध्ये नेण्यात येणार्‍या हिंदूंची सुटका

धर्मांतर केल्यास प्रतिमहा ५० सहस्र रुपये देण्याचे दाखवण्यात आले होते आमीष !

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात असूनही धर्मांध ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर करण्यास धजावतात, यावरून त्यांचा उद्दामपणा दिसून येतो. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! -संपादक

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे काही हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना २ बसमध्ये बसवून उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील चर्चमध्ये नेण्यात येत होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी बसगाड्या थांबवून या प्रकरणी २ जणांना अटक केली. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. ज्यांचे धर्मांतर होणार होते, ते सर्व गरीब कुटुंबातील होते. धर्मांतर करण्यासाठी प्रत्येक हिंदूला प्रतिमहा ५० सहस्र देण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. त्यामुळेच ते धर्मांतरासाठी सिद्ध झाले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *