Menu Close

देश ‘गजवा-ए-हिंद’ करायचा असल्याचे सांगत धर्मांधाने केला अल्पवयीन हिंदु मुलीवर अत्याचार !

(‘गजवा-ए-हिंद’ म्हणजे भारतीय उपखंडाचे इस्लामीकरण)

प्रतिकात्मक छायाचित्र

श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर) – तालुक्याच्या पश्‍चिमेकडील गावातील दहावीच्या वर्गात शिकणार्‍या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीला एका धर्मांधाने पिस्तुलाचा धाक दाखवून पुणे येथे पळवून नेले. तेथील लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. (‘मुसलमान आणि मागासवर्गीय भाई-भाई’, अशा घोेषणा देणारे अशा प्रकरणांच्या वेळी कुठल्या बिळात लपून बसतात ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) ‘अत्याचार करणार्‍या तरुणाने हा देश ‘गजवा-ए-हिंद’ करायचा आहे’, असे सांगत माझ्यावर अत्याचार केल्याचे पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला २९ मार्च या दिवशी अटक केली असून न्यायालयाने त्यास ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने श्रीगोंदे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीमध्ये म्हटले आहे की, २६ मार्चला पीडित मुलगी बेलवंडी येथे गेली असतांना, आरोपीने तिला दुचाकीवर बसण्यासाठी आग्रह केला. त्या वेळी मुलीने त्याच्या दुचाकीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे या तरुणाने मुलीला पिस्तुलाचा धाक दाखवत बळजोरीने दुचाकीवर बसवत तिला शिरूर (जिल्हा पुणे) येथे नेले. तेथून ते बसने पुण्याला गेले. पुण्यातील एका लॉजवर रात्री त्याने तिच्यावर अत्याचार केला. २८ मार्चला हे दोघे नारायणगाव (तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) येथील मुलाच्या आजीच्या घरी गेले. मुलाच्या आजीने दोघांना बेलवंडी पोलीस ठाण्यात उपस्थित केले. त्यानंतर पोलिसांनी दोघांची सखोल चौकशी केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *