शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्च संस्थेचा सुनियोजित प्रयत्न !
Share On :
शंखवाळ (सांकवाळ) येथील वारसा स्थळी ख्रिस्त्यांकडून शव आणून प्रार्थना करण्याचा प्रकार !
पणजी : शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्च संस्थेचा सुनियोजित प्रयत्न आजही चालूच आहे. शंखवाळ (सांकवाळ) येथील वारसा स्थळी ख्रिस्त्यांनी नुकतेच एक शव आणून त्या ठिकाणी प्रार्थना केल्या. या ठिकाणी प्रथमच असा प्रकार घडला आहे. वारसा स्थळी कोणतीही कृती करण्यास अनुमती नाही, तरीही अशा घटनांकडे सरकार आणि प्रशासन कानाडोळा करत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकेल, अशा कृती केल्या जात आहेत.
वारसा स्थळी अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या ‘कॅपेल’वर (लहान चर्चवर) हल्लीच एक ध्वनीक्षेपक लावण्यात आला आहे. ध्वनीक्षेपकाची दिशाही जवळच्या गोशाळेच्या दिशेने करण्यात आली आहे.
वारसा स्थळी शव आणून प्रार्थना करण्याचा प्रकार निषेधार्ह ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल
पणजी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या ठिकाणी (वारसा स्थळी) अतिक्रमण करण्याचे प्रकार चालूच आहेत. वारसा स्थळी शव आणून प्रार्थना करण्याचा प्रकार पूर्णपणे निषेधार्ह आहे. हा प्रकार रोखण्याचे दायित्व सरकारचे नाही का ? वारसा स्थळी चाललेल्या अनधिकृत कृत्यांविषयी गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याकडे अनेक वेळा रितसर आणि आवश्यक कागदपत्रांसह तक्रारी नोंदवूनही या तक्रारींची नोंद घेतली जात नाही.
आता सरकारमधील मंत्री निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत व्यस्त आहेत. आम्ही न्याय कुणाकडे मागायचा, हे कोण सांगेल का ? असा प्रश्न ‘आंतरराष्ट्रीय बजरंग दला’चे गोवा विभाग प्रमुख नितीन फळदेसाई यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
(सौजन्य : Global Astrovastu)
शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची पार्श्वभूमी