Menu Close

नाशिक येथे महंत पिठाधीश्‍वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर धर्मांधांच्या जमावाकडून आक्रमण

  • ९०० ते १ सहस्र मुसलमान जमले

  • गाडीवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण, तसेच काठ्याही मारल्या

  • आतापर्यंत ४ वेळा आक्रमण

  • हिंदूंच्या धर्मगुरूंवर वारंवार होणारी आक्रमणे हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता अधोरेखित करतात !
  • सहस्रोंच्या संख्येने धर्मांध जमले असतांना पोलीस काय करत होते ? धर्मांधांच्या हिंसकतेला नियंत्रणात न ठेवणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! -संपादक 
महंत पिठाधीश्‍वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज

नाशिक (महाराष्ट्र) – अखिल भारतीय संत समिती, तसेच धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रमुख आणि महंत पिठाधीश्‍वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर ३ एप्रिलला रात्री १ वाजता ९०० ते १ सहस्र धर्मांधांनी नाशिक महामार्गाच्या जवळ आक्रमण केले अन् त्यांच्या गाडीच्या काचेची हानी केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून राज्य सरकारकडे महाराजांनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. वर्ष २०२० मध्ये पालघर येथे जमावाने २ साधूंवर आक्रमण करून त्यांची हत्या केली होती. ‘या हत्याकांडासारखेच हे आक्रमण झाले’, अशी भीती महाराजांनी व्यक्त केली. महाराजांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांनी रस्त्यावरील अन्य गाड्यांचीही तोडफोड केली. महाराजांच्या गाडीवर लाथा आणि काठ्याही मारल्या. या वेळी ‘एका गल्लीतून गाडी बाहेर काढून आम्ही आमचा जीव वाचवला’, असे महाराजांनी सांगितले.

आतापर्यंत त्यांच्यावर झालेले हे चौथे आक्रमण आहे. याआधी काही अनोळखींनी त्यांच्या आश्रमावर दगडफेक करणे, गोशाळेवर दारूच्या बाटल्या फेकणे, वारंवार गाडीवर दगडफेक करणे, असे प्रकार केले होते.

सरकार हिंदूंच्या धर्मगुरूंचे रक्षण करण्यास असमर्थ असेल, तर हिंदूंनीच त्यांचे रक्षण करणे आवश्यक ! – रणजीत सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष

उजवीकडे रणजीत सावरकर

डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर झालेल्या आक्रमणाचा मी निषेध करतो. बहुसंख्य हिंदू असलेल्या ठिकाणी हिंदूंच्या धर्मगुरूंवर वारंवार आक्रमणे होणे वेदनादायी आहे. शासनाने याविषयी कठोर कारवाई करून ही प्रवृत्ती मोडून काढणे आवश्यक आहे. पालघर प्रकरणात अजूनही दोषींना शिक्षा झालेली नाही, हे हिंदु समाज विसरला नाही. सरकार हिंदूंच्या धर्मगुरूंचे रक्षण करण्यास असमर्थ असेल, तर आता हिंदूंनीच हिंदु धर्म आणि धर्मगुरु यांचे रक्षण करणे आवश्यक आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *