Menu Close

हावडा येथे रामनवमी शोभायात्रेला बंगाल पोलिसांनी नाकारली अनुमती !

  • लोकवस्ती नसण्याच्या मार्गावरून यात्रा नेल्यासच अनुमती देणार!

  • प्रतिवर्षी ५० सहस्र उपस्थितीत होणारी शोभायात्रा २०० लोकांत आटोपण्याचा आदेश !

  • गेल्या वर्षी शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी केले होते आक्रमण !

  • तृणमूल काँग्रेस सत्तेत असलेल्या बंगालमध्ये यापेक्षा वेगळे काय घडणार ? अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झालेले असले, तरी त्यांच्या राष्ट्रात हिंदूंना त्यांचीच शोभायात्रा काढण्यासाठी अनुमती नाकारली जाते, हे हिंदूंसाठी लांच्छनास्पद ! यावर रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन करण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, हे जाणा !
  • अशा प्रकारे कायद्याचा बडगा उगारायला हावडा हे भारतात आहे कि पाकिस्तानात ? -संपादक 

हावडा (बंगाल) – प्रतिवर्षी रामनवमीच्या निमित्ताने येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘अंजनी पुत्र सेने’कडून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यंदा १७ एप्रिल या दिवशी रामनवमी असून त्या दिवशीही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. असे असले, तरी बंगाल पोलिसांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, यात्रेचा मार्ग पालटल्यासच अनुमती दिली जाईल. तसेच केवळ २०० लोकांनाच यात्रेत सहभागी होण्याची अनुमती देऊ. या विरोधात ‘अंजनी पुत्र सेना’ कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहे, अशी माहिती सेनेचे संस्थापक सचिव सुरेंद्र कुमार वर्मा यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. यासंदर्भात हावडा क्षेत्राचे अतिरिक्त पोलीस आयुक्त के. साबरी राज कुमार यांना संपर्क केला असता त्यांनी निवडणुकांची बैठक असल्याचे कारण देत यावर उत्तर देण्याचे टाळले.

‘अंजनी पुत्र सेने’ चे संस्थापक सचिव सुरेंद्र कुमार वर्मा

१. गतवर्षीच्या रामनवमी शोभायात्रेच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी यात्रेत सहभागी झालेल्या हिंदूंवर आक्रमण केले होते. वर्मा यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की, बंगाल पोलीस हिंदूंचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे. खरेतर त्यांनी हिंसाचार रोखला पाहिजे. याऐवजी ते हिंदूंना नेहमीच्या ‘जीटी रोड’ या मार्गावरून यात्रा काढू न देता लोकवस्ती नसलेल्या ‘फोरसोर रोड’ या मार्गान्वये यात्रा काढण्यास सांगत आहेत. तसेच आम्हाला आचारसंहितेचे कारणही दिले जात आहे.

२. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही आम्हाला शोभायात्रा काढण्यास अनुमती देण्यात आली होती. गेली १० वर्षे आम्ही ही यात्रा काढत आहोत. पहिल्या वर्षीच २ सहस्र हिंदू सहभागी झाले. गेल्या काही वर्षांत ही संख्या ५० सहस्रांहूनही अधिक झाली. असे असतांना आम्हाला केवळ २०० हिंदूंना घेऊनच यात्रा काढण्याचा आदेश देण्यात आला आहे. आम्ही या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहोत. आम्हाला न्यायालयावर विश्‍वास आहे.


काय झाले होते गतवर्षीच्या रामनवमीला ?

हावडा येथील शिवपूर भागात श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजे ३० मार्च २०२३ च्या सायंकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक आणि मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती. दुसर्‍या दिवशीही येथील हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. दोन्ही वेळेला पोलिसांचा, तसेच अर्धसैनिक दलाचा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित असतांनाही धर्मांध मुसलमान हिंसाचार करत होते. त्यांनी पोलिसांच्या गाड्याही या वेळी जाळल्या होत्या. बंगाल पोलिसांकडून योग्य कारवाई होत नसल्याने न्यायालयाने हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात आले. एन्.आय.ए.ने या प्रकरणी २६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी १६ धर्मांध मुसलमानांना अटक केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *