Menu Close

वडोदरा (गुजरात) येथील ‘हुसैनी समोसावाला’ दुकानात विकले जात होते गोमांस भरलेले समोसे

६ मुसलमानांना अटक

मुसलमानांच्या खाद्यपदार्थांच्या दुकानात एकतर थुंकी असलेले किंवा गोमांस असलेले पदार्थ मिसळण्याचा प्रयत्न केला जातो, हे अनेकदा उघड झाले आहे. हे पहाता आता हिंदूंनी अशा दुकानांवर बहिष्कार घातला, तर आश्‍चर्य वाटू नये ! -संपादक 

वडोदरा (गुजरात) – येथील प्रसिद्ध ‘हुसैनी समोसावाला’ या दुकानावर पोलिसांनी धाड टाकून युसूफ शेख, नसीम शेख, हनिफ भटियारा, दिलावर पठाण मोईन हबदल आणि मोबीन शेख या ६ जणांना अटक केली. या दुकानातून गोमांस भरलेले समोसे विकण्यात येत होते. पोलिसांनी दुकानातून समोसे भरण्यासाठी बनवलेले साहित्य जप्त केले. तसेच दुकानातून शंभर किलो गोमांसाचा साठा जप्त केला.

शहरात गोमांस समोसे विकले जात असून काही ग्राहक ते मांसाचे समोसे असल्याचे समजून ते खरेदी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपायुक्त पन्ना मोमाया यांनी सांगितले की, आरोपी मोठ्या प्रमाणात कच्चे समोसे बनवायचे आणि नंतर दुकानात विकायचे. तेथे दुकानदार ते तळून ग्राहकांना देत असत. ते किती दिवसांपासून गोमांस समोसे विकत होते आणि गोमांस कुठून आणले जात होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *