एका धर्मांधाला अटक, तर ४ धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंद !
खाद्यपदार्थांत थुंकी मिसळण्याचे कृत्य धर्मांध करत होतेच, आता हे किळसवाणे कृत्य उघडकीस आले आहे. इतरांच्या आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा हा ‘अन्न जिहाद’ न थांबणारा आहे, हेच लक्षात येते. त्यामुळे अशा विकृतांकडील पदार्थ खायचे का ?, ते जनतेने ठरवावे ! -संपादक
पिंपरी (जिल्हा पुणे) : आस्थापनात सामोसे पुरवण्याचे काम दुसर्या कंत्राटदाराला मिळाल्याने पहिल्या कंत्राटदाराने षड्यंत्र रचून स्वत:कडील काही कामगार दुसर्या कंत्राटदाराकडे कामाला पाठवले. त्यांच्या माध्यमातून आस्थापनाला पुरवण्यात येणार्या सामोशामध्ये निरोध, विमल पानमसाला आणि दगड टाकल्याचे किळसवाणे कृत्य केले. हा प्रकार नुकताच चिखली येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी फिरोज शेख उपाख्य मंटू याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह ‘एस्.आर्.एस्. इंटरप्रायझेस’चा मालक रहीम शेख, अझर शेख, मझर शेख, विकी शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी ‘कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा.ली कंपनी’चे साहाय्यक महाव्यवस्थापक कीर्तिकुमार देसाई यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.
(सौजन्य : Times Now)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘टाटा मोटर्स कंपनी’च्या उपाहारगृहामध्ये खाद्यपदार्थ पुरवण्याचे कंत्राट तक्रारदार देसाई यांच्या आस्थापनाला मिळाले आहे. देसाई यांचे आस्थापन पूर्वी मोरवाडी येथील ‘एस्.आर्.एस्. इंटरप्रायझेस’ या उपआस्थापनाकडून सामोसा घेत असे. याविषयी त्यांनी करारही केला होता; मात्र, ‘एस्.आर्.एस्. इंटरप्रायझेस’ने पुरवलेल्या एका सामोसामध्ये प्रथमोपचार पट्टी मिळाली. त्यामुळे देसाई यांनी त्यांच्यासमवेतचा करार रहित केला. त्यानंतर देसाई यांच्या ‘कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा.ली कंपनी’ या आस्थापनाने सामोसा पुरवण्यासाठी ‘मे. मनोहर एंटरप्रायझेस’ या आस्थापनाशी करार केला. देसाई यांच्या आस्थापनाची प्रतिष्ठा मलीन व्हावी, तसेच त्यांचा प्रतिष्ठित आस्थापनातील करार रहित व्हावा, यासाठी ‘एस्.आर्.एस्.’चे मालक रहीम शेख, अझर शेख आणि मझर शेख यांनी त्यांचे कामगार फिरोज अन् विकी यांना मनोहर एंटरप्रायझेस येथील कारखान्यात कामासाठी पाठवले. ‘एस्.आर्.एस्.च्या रहीम, अझर आणि मझर यांच्या सांगण्यावरून कामगार फिरोज आणि विकी यांनी काही सामोशांमध्ये निरोध भरले, तर काही सामोशांमध्ये दगड, तसेच विमल पान मसाला हा तंबाखूजन्य पदार्थही भरला. हा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी चिखली पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात