Menu Close

शिरपूर (जिल्हा जळगाव) येथे मुसलमान तरुणीकडून ३ हिंदु तरुणींचे वशीकरण करण्याचा प्रयत्न फसला

  • एका हिंदु तरुणीच्या जागरूकतेचा परिणाम !

  • मुसलमान तरुणीने हिंदु नाव धारण करून हिंदु तरुणींशी केली मैत्री !

  • घटनेनंतर मुसलमान तरुणी राजस्थान येथे पसार !

  • हिंदुत्वनिष्ठांकडून शिरपूर पोलिसांना निवेदन सादर !

  • हिंदूंवर आघात करण्यात आता धर्मांध मुसलमान मुलीही सरसावल्या आहेत, हेच यावरून लक्षात येते ! अशांवर आता अंधश्रद्धानिर्मूलन कायद्यांर्तगत कारवाई करण्याची धमक पोलीस दाखवतील का ?
  • हिंदु तरुणींनी धर्मशिक्षण घेऊन साधना केल्यास त्या स्वतःची अशी फसवणूक होण्यापासून वाचू शकतील !
  • हिंदु तरुणींच्या मागे ठामपणे उभे रहाणार्‍या सर्व हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! -संपादक 
पोलीस निरीक्षक के.के. पाटील (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना हिंदुत्वनिष्ठ

शिरपूर (जिल्हा जळगाव, महाराष्ट्र) : येथील करवंद नाक्याजवळ ‘बालाजी लेडीज हॉस्टेल’ या मुलींच्या वसतीगृहात एका मुसलमान तरुणीने हिंदु मुलीचे नाव धारण करून ३ हिंदु तरुणींवर वशीकरण करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट या तिघींपैकी एका हिंदु तरुणीला समजल्यानंतर तिने याविषयी माहिती हिंदुत्वनिष्ठांना दिली. (सतर्क असणार्‍या हिंदु तरुणीचे अभिनंदन ! – संपादक) हिंदुत्वनिष्ठांनी झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देऊन मागण्यांचे निवेदन दिले. पोलिसांत तक्रार करताच मुसलमान तरुणी पसार झाली असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

धर्मांध तरुणीने हिंदु तरुणींच्या बॅगेत ठेवलेले वशीकरणाचे साहित्य

१. ‘हिंदु तरुणींवर वशीकरण करून त्यांचे धर्मांतर करणे, धर्मांधांच्या कह्यात हिंदु तरुणींना सोपवून ‘लव्ह जिहाद’ घडवणे’, असे षड्यंत्र मुसलमान तरुणीने रचले होते.

२. शिरपूर, चोपडा आणि आणखी एका गावातील तरुणी अशा एकूण ३ हिंदु तरुणींशी जवळीक साधून तिने कागदावर लिखाण केलेले वशीकरणाचे साहित्य त्यांच्या बॅगेत गुपचूप ठेवले.

३. हा प्रकार ‘द केरल स्टोरी’ चित्रपटात दाखवलेल्या घटनेनुसार असल्याची चर्चा आहे. चोपडा येथील एका हिंदु तरुणीच्या निदर्शनास हा प्रकार आला. तिने हिंदुत्वनिष्ठांशी संपर्क साधून याची माहिती दिली.

https://www.facebook.com/OurLeaderRBC/posts/799545048891401?ref=embed_post 

४. हिंदुत्वनिष्ठांनी अधिवक्ता रोहितभाऊ चांदोडे यांच्याशी संपर्क साधला. अधिवक्ता चांदोडे यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांतील हिंदुत्वनिष्ठांनी शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली, तसेच घटनास्थळी जाऊन वसतीगृहाचे चालक जयस्वाल यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती घेतली.

अधिवक्ता रोहितभाऊ चांदोडे

५. या घटनेतील मुसलमान तरुणीवर कारवाई करण्याविषयी पोलिसांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी ‘या प्रकरणाचे अन्वेषण करून आरोपी मुसलमान तरुणीवर कारवाई करण्यात येईल’, असे आश्‍वासन हिंदुत्वनिष्ठांना दिले.

६. हा प्रकार उघड झाल्याने मुसलमान तरुणी राजस्थान येथील तिच्या मूळ गावी पळून गेली आहे. तिचा मामा कर्णावती (अहमदाबाद) येथे रहात असल्याची माहिती हिंदुत्वनिष्ठांना मिळाली आहे. त्यानुसार ‘पोलिसांनी जलदगतीने अन्वेषण करून मुसलमान तरुणीला अटक करावी’, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे.

७. या संदर्भात ‘दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना अधिवक्ता रोहितभाऊ चांदोडे म्हणाले, ‘‘या प्रकरणी पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्याशी चर्चा झालेली आहे. पोलिसांच्या अन्वेषणानंतर पुढील भूमिका घेण्यात येईल.’’

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *