Menu Close

हिंदु धर्म स्वीकारून ‘हैदर’वरून ‘हरिनारायण’ झालेल्या तरुणाच्या घरावर आक्रमण

  • इंदूर (मध्यप्रदेश) येथील घटना !

  • हरिनारायण याला ठार मारण्याची धमकी !

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! -संपादक 

हरिनारायण यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली.

इंदूर (मध्यप्रदेश) – इंदूर शहरातील खजराना पोलीस ठाण्याच्या परिसरात काही दिवसांपूर्वी ७ जणांनी हिंदु धर्म स्वीकारला होता. यानंतर यांच्यापैकी एक असलेल्या हरिनारायण (पूर्वाश्रीमीचा हैदर) या तरुणाच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली. यात त्याच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. हरिनारायण याला ठार मारण्याच्या धमक्याही मिळत आहेत. अशा परिस्थितीत घाबरलेल्या हरिनारायण याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून संरक्षणाची मागणी केली.

या तक्रारीविषयी पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.  याप्रकरणी विश्‍व हिंदु परिषदेचे प्रांत संपर्क प्रमुख संतोष शर्मा यांनी सांगितले की, या धमकीबद्दल सांगायचे, तर ही धमकी महाराष्ट्रातील एका इस्लामी संघटनेने दिली आहे. तेथून धमकीचे पत्र देण्यात आले आहे. यामध्ये हरिनारायणला ‘काफिर’ म्हटले आहे. आम्ही आमचे काम करत आहोत आणि करत राहू. हिंदु धर्मात आणण्याचे काम चालू राहील. धमकी देणार्‍या संघटनांवर बंदी घातली पाहिजे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *