Menu Close

पूंछ (काश्मीर) येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात १ सैनिक हुतात्मा, तर ४ जण घायाळ

गेल्या ६ महिन्यांत पूंछमध्ये तिसरे आक्रमण !

जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकच्या अस्तित्वामुळेच ही आतंकवादी आक्रमणे होत असून त्याचा संपूर्ण नि:पात करणे, हाच यावरील मूलगामी उपाय आहे, हे लक्षात घ्या ! -संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील पूंछ भागात ४ मेच्या सायंकाळी जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात एक सैनिक हुतात्मा झाला, तर किमान ४ सैनिक घायाळ झाले. हुतात्मा झालेल्या सैनिकाचे नाव कॉर्पोरल विक्की पहाडे असून ते भारतीय हवाईदलात कार्यरत होते.

पूंछ येथील सुरनकोट भागात संरक्षणयंत्रणांच्या दोन गाड्या रस्त्यावरून जात असतांना ४ आतंकवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दोनपैकी एक गाडी ही भारतीय हवाईदलाची होती. आक्रमण केल्यावर आतंकवादी जंगलात पळून गेले. स्थानिक पोलीस आणि संरक्षण यंत्रणा आतंकवाद्यांचा शोध घेत आहेत. पूंछ हा राजौरी-अनंतनाग लोकसभा मतदारसंघात येत असून तेथे २५ मे या दिवशी मतदान होणार आहे.
पूंछ भागात गेल्या अडीच वर्षांत एकूण ६ आतंकवादी आक्रमणे झाली असून यांत २१ सैनिक शहीद झाले आहेत, तर गेल्या ६ महिन्यांत हे तिसरे आक्रमण आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *