हिंदु जनजागृती समितीची शिक्षण विभागाकडे मागणी !
मुंबई – हमाससारख्या क्रूर आतंकवादी संघटनेचे समर्थन करूनही त्याविषयी अपराधीपणाची भावना न बाळगता, उलट स्वत:च्या देशद्रोही कृतीचे समर्थन करणार्या सोमय्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांची पदावरून त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यशासनाकडे केली आहे. याविषयी ६ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंत्रालयामध्ये जाऊन शिक्षण विभागाच्या सचिवांकडे कारवाईची मागणी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
हिंदु जनजागृती समितीची प्रेसनोट
https://drive.google.com/file/d/1vl2CSNy_BvoCfb0MhyArzY5570OY6HsT/view
या वेळी अधिवक्ता अनिश परळकर, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक, राष्ट्रप्रेमी नागरिक श्री. विलास निकम, संदीप तुळसकर आणि वेणुगोपाळ बल्ला हे उपस्थित होते. आतंकवाद्यांचे समर्थन करूनही शाळा व्यवस्थापनाने त्यागपत्र देण्याची मागणी केल्यावर परवीन शेख यांनी ‘मी भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात रहात असून मला बोलण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. शाळा व्यवस्थापन त्यागपत्र देण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहे’, असा बनाव केला. हा गंभीर प्रकार हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिला.
आतंकवाद्यांची बाजू घेणार्या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ?
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे कारण पुढे करून परवीन शेख यांनी आतंकवाद्यांची बाजू घेतली आहे. अशा मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ?, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीने या निवेदनात उपस्थित केला आहे.
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करा ! – गृहविभागाकडे मागणी
परवीन शेखसारख्या भारतातील सुशिक्षित मुसलमान महिला आतंकवादाला उघडपणे सहानुभूती दार्शवतात, हे गंभीर आहे. अशा प्रकारे सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे किंवा अन्य माध्यमांद्वारे कुणी आतंकवाद्यांचे समर्थन करत असेल, तर त्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीने गृहविभागाकडे केली आहे.