Menu Close

चाकण- तळेगाव (पुणे) रस्त्यावर अपघातग्रस्त वाहनातून ६०० किलोहून अधिक गोमांस शासनाधीन

आणखी किती घटना उघडकीला आल्यावर भाजप शासन गोवंशहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करणार आहे ? गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

पुणे – चाकण-तळेगाव रस्त्यावर खेडमधील खालुंब्रे येथे ६ सप्टेंबर या दिवशी एका वाहनाचा अपघात झाला असून त्यामध्ये ६२० किलो गोमांस आढळले आहे. या वाहनातील धर्मांध वसीम शेख आणि झाकीर पठाण (रा. मुंबई) हे दोघे घायाळ झाले आहेत. (अल्पसंख्यांक धर्मांध गोवंश हत्येच्या गुन्हेगारीत मात्र पुढे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलिसांनी त्या दोघांची रुग्णालयात चौकशी चालू केली असून सर्व गोमांस शासनाधीन केल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिली.

चाकण-तळेगाव रस्त्याने एका चारचाकी वाहनातून गोमांस नेण्यात येत होते. खालुंब्रे गावाच्या आधी असलेल्या तीव्र वळणावरून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. वाहनातील गोमांस बाहेर फेकले गेले. सदर वाहन अपघातग्रस्त झाल्याने त्या वाहनातून गोमांस नेले जात असल्याची घटना उघड झाली आहे. धर्मांधांनी हे गोमांस कोठून आणले, याची चौकशी चाकण पोलीस करत आहेत. या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्याची प्रक्रिया चालू होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *