पुणे – काँग्रेसने नेहमीच ‘हिंदु आतंकवादा’चे ‘नॅरेटिव्ह’ पेरण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट कुणीच नाकारू शकत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात असे घडले आहे कि नाही ? हे मी आता सांगू शकत नाही. जेव्हा मी निकाल बघेन, तेव्हाच या प्रकरणात तसे घडले होते कि नाही ? ते मी सांगू शकेन, असे उत्तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना ‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी त्यांनी या प्रकरणात सनातनच्या साधकांची नावे गोवली, असा आरोप सनातन संस्थेने केला आहे. तरी पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या काळात नेमके काय केले ? तुम्हाला काय वाटते ?, असे प्रश्न पुणे येथील वार्तालापात पत्रकारांनी विचारल्यावर गृहमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.
मशिदीत कुणाला मतदान करावे ? या संदर्भात फतवे काढून आवाहन करण्यात येत आहे ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
महाराष्ट्रात पहिल्यांदा असे घडते आहे की, मशिदीत दूरचित्रवाणी लावून आणि फतवा काढून कुणाला मतदान करावे, हे आवाहन केले जात आहे, हे योग्य नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हेच जाहीररित्या सभेत सांगितले असून त्यात चुकीचे असे काहीच नाही. असे फतवे काढल्याचे काही ‘व्हिडिओ’ प्रसिद्धीमाध्यमांनीही दाखवले आहेत आणि असे ‘व्हिडिओ’ माझ्याकडेही आहेत.
डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी उच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय कायदा आणि वकिली विभागाच्या मतानुसार घेऊ ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
पुणे – एखाद्या प्रकरणात जेव्हा न्यायालयाचा निर्णय येतो, तेव्हा त्या प्रकरणात अपील करायचे कि नाही ? हा निर्णय राज्याचा कायदा विभाग आणि राज्याचे वकिली विभागाचे प्रमुख घेतात. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या संदर्भात जेव्हा सविस्तर निर्णय येईल, तेव्हा हे दोघे एकत्र येऊन तो निर्णय घेतील. त्यांचा जो निर्णय असेल, तोच निर्णय राज्य सरकारचा असेल. या संदर्भात न्यायालयाने जर काही ताशेरे ओढले असतील आणि त्याची दुसरी बाजू असेल, तर त्याची नोंद आम्ही अवश्य घेऊ, असे मत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते पुणे येथील वार्तालापात बोलत होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात
after congress mukth bharath ,next communist,naxal,maoist mukth bharath is around the corner?