पाटलीपुत्र (बिहार) – जीवनात येणारे सुख आणि दु:ख नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे आहे. ते मागील जन्मांमध्ये आपल्याकडून झालेल्या कर्मानुसार प्रारब्धाच्या रूपात भोगावेच लागते. साधना केल्याने भोग भोगण्याची क्षमता मिळते. त्यामुळे कठीण प्रसंगातही व्यक्ती स्थिर राहू शकते. कलियुगात नामस्मरण हीच साधना आहे. नामजपाला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. त्यामुळे भवसागर पार करून देणार्या आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण आपण अधिकाधिक केले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. पाटलीपुत्रमधील कंकडबाग येथील शिव मंदिराच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शंकानिरसन केले, तसेच सर्वांनी तेथे साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची इच्छा प्रदर्शित केली.
कुलदेवतेच्या नामस्मरणामुळे प्रारब्ध सुसह्य होते – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती
Tags : हिंदु जनजागृती समिती