Menu Close

‘मंदिर किंवा चर्चमध्ये जाण्यापेक्षा आतंकवाद्यांसाठी शस्त्रे बनवणार्‍या कारखान्यात जाणे चांगले’ – झाकीर नाईक

फरार असलेला इस्लामचा धर्मप्रचारक झाकीर नाईकने पुन्हा विष ओकले !

अशा विद्वेषी विधानांना मुसलमान कधी विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या ! -संपादक 

इस्लामचा धर्मप्रचारक झाकीर नाईक

नवी देहली – फरार असलेला इस्लामचा धर्मप्रचारक झाकीर नाईक याने पुन्हा एकदा विष ओकले आहे. तो म्हणाला की, मंदिर किंवा चर्चमध्ये जाण्यापेक्षा आतंकवाद्यांसाठी शस्त्रे बनवणार्‍या कारखान्यात जाणे चांगले आहे. अशी धार्मिकस्थळे बांधणे, हे सर्वांत मोठे पाप असून त्यांच्या उद्घटनाला उपस्थित रहाणेही चुकीचे आहे. काही दिवसांपूर्वी महंमद झिशान नावाच्या तरुणाने झाकीर नाईकला संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका मंदिर निर्माण आस्थापनात नोकरी मिळवण्याविषयी प्रश्‍न विचारला होता. त्यावर उत्तर देतांना झाकीर नाईकने वरील वादग्रस्त विधान केले.

झाकीर नाईक पुढे म्हणाला, ‘‘मंदिर निर्माणाचे काम करणे, हे फार मोठे पाप आहे.  आपण इस्लामविना इतर कोणत्याही धार्मिक स्थळासाठी काम करू शकत नाही.ते ‘हराम’ (निषिद्ध) मानले जाईल.’’

कोण आहे झाकीर नाईक ?

झाकीर नाईक हा मुंबईत जन्मलेला वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक आहे. सध्या तो मलेशियामध्ये रहातो. भारतातील विविध खटल्यांमध्ये तो आरोपी आहे. वर्ष २०१६ मध्ये त्याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ या संस्थेवर भारतात बंदी घालण्यात आली होती. एवढेच नाही तर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने झाकीर नाईकविरुद्ध ‘बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत गुन्हाही नोंदवला आहे. त्याच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने पैशांच्या अफरातफरीशी संबंधित आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणानंतर त्याने भारतातून पलायन केले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *