जे सरकार भारतातील मंदिरांचे रक्षण करू शकत नाही, ते विदेशातील हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण काय करणार ?
भारतासह जगभरातील विविध देशांतील मंदिरे असुरक्षित !
वरील चित्र हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी नसून देवतेच्या मूर्तीची केलेली विटंबना समाजावी, यासाठी छापण्यात आले आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी !
क्वालालंपूर (मलेशिया) : मलेशियाच्या पेनांग राज्यात असलेल्या आराकुडा येथील सेबेरांग पेरई सेंट्रल क्षेत्रातील मुथुमारियाम्मन् मंदिरावर काही धर्मांधांनी आक्रमण केले. मंदिरातील ४ देवतांच्या मूर्ती या वेळी तोडण्यात आल्या. पेनांग राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले पी. रामासामी यांनी या आक्रमणामागे राजकारण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मंदिरावर होणारी अशी आक्रमणे धार्मिक ध्रुवीकरणाचा भाग आहेत. मंदिर समितीचे अध्यक्ष श्री. बाला नांबियार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
देशातील इपोह येथील श्री मुनीश्वरन् अम्मन् मंदिरातील मूर्तीही गेल्या मासात तोडण्यात आल्या होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात