Menu Close

जैश-ए-महंमदकडून आणंद (गुजरात) मधील मंदिरावर आक्रमण करून पुजार्‍यांना ठार करण्याची धमकी !

हिंदूंनो, अशी धमकी मशीद किंवा चर्च यांना मिळत नाही, त्यामुळे जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो आणि ते हिंदूंनाच लक्ष्य करतात, हे सत्य आहे !

mandir-vidhvans

आणंद : गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील सारसा गावात असलेल्या कैवाल मंदिराचे पुजारी अविचलदासजी महाराज यांना १ जून या दिवशी दोन पत्रे मिळाली आहेत. यात त्यांना ठार मारण्याची तसेच मंदिर बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्र पाठवणार्‍याने तो जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचा आतंकवादी असल्याचे म्हटले आहे.

सत कैवाल एक धार्मिक संप्रदाय असून त्याचे अनुयायी येथे मोठ्या संख्येने रहातात. तसेच अनिवासी भारतीयही या संप्रदायाचे अनुयायी आहेत. हे पत्र गुजराती आणि हिंदी भाषेत लिहिण्यात आले आहे. या मंदिराचे अवलोकन (रेकी) करण्यात आल्याचेही यात म्हटले आहे. बाबरी मशीद आणि गुजरात दंगल यांचा सूड उगवण्यासाठी मंदिरावर आक्रमण करण्याचे नियोजन आहे, असे या पत्रात म्हटले आहे. पोलीस आमचे काहीच करू शकत नाहीत आणि मोदीही तुम्हाला वाचवू शकत नाहीत. तुम्हाला माहितच असेल की, सुरतमध्ये प्रवीण तोगाडीया यांच्या नातेवाइकांचे काय झाले ते ?, असेही यात म्हटले आहे.

अविचलदासजी महाराज अखिल भारतीय संत समाजाचे राष्ट्रीय सचिवही आहेत. नुकतेच उज्जैनच्या सिंहस्थात त्यांनी गोहत्येच्या विरोधात व्याख्यान दिले होते.

पोलिसांनी अविचलदासजी महाराज आणि मंदिर यांना सुरक्षा दिली आहे. तसेच या संदर्भात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *