Menu Close

सैराट चित्रपटामुळे सातारा जिल्ह्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांना उधाण !

एकाच आठवड्यात दोन घटना उघडकीस

Love_jihad_M

सातारा : महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपट सैराटमुळे महाराष्ट्रातील युवक सैरभैर झाले आहेत. त्यातच चित्रपटातील कथानकामुळे हा चित्रपट आंतरजातीय विवाहाला खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जुन्या प्रेमप्रकरणातील प्रेयसी आणि प्रियकर आता चित्रपटातील नायक आणि नायिकेप्रमाणे पळून जाऊन विवाह करत आहेत. दुर्दैवाने सातारा जिल्ह्यात या घटनांना उधाण आले असून एकाच आठवड्यात अशा प्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये हिंदूंच्या मुली असून मुसलमान समाजातील मुले आहेत. या दोन्ही हिंदू मुली लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत, असे त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे.

sairat_love_jihad

कराड तालुक्यात लव्ह जिहादच्या एका घटनेत मुसलमान युवकाने फूस लावून हिंदु-जैन युवतीला पळवून नेले आहे. या युवकाला त्याच्या समाजातील सर्वांनी पाठिंबा दिला आहे. संतप्त नातेवाइकांनी युवक आणि युवती यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. त्या वेळी युवतीने बुरखा घातला होता. तसेच तिच्या दंडात आणि गळ्यात ताईत बांधण्यात आले होते. युवतीच्या आईने तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करताच तिने जवळ येण्यास नकार दिला. यामुळे आईने पोलीस ठाण्यातच हंबरडा फोडला. या सर्व प्रसंगामुळे व्यथित होऊन युवतीच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांना खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती करावे लागले. तरीही या मुलीने मी सज्ञान असून या युवकासमवेतच रहाणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आनंदीत होऊन मुस्लिम समाज कराड शहरात विजयी मिरवणूक काढणार असल्याची चर्चा आहे.

दुसर्‍या घटनेत सातार्‍यातील उच्चविद्याविभूषित युवती आणि दहावी अनुत्तीर्ण मुसलमान युवकाने लग्न केले. त्यांचे तथाकथित प्रेमप्रकरण चालू होते; मात्र त्यांनी सैराट पाहून लग्न केले. हे उघड झाल्यानंतर गावातील युवकांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे ओळखले. धर्माभिमानी युवकांनी संघटित होऊन ग्रामस्थांची बैठक घेतली आणि त्यांना लव्ह जिहादचे परिणाम समजून सांगितले. यामुळे जागृत झालेल्या ग्रामस्थांनी गावात केवळ ८-१० घरे असणार्‍या मुसलमान समाजाला गुण्या-गोविंदाने रहाण्याची विनंती केली. हिंदूंच्या संघटित आविष्कारापुढे नमते घेत मुसलमान समाजाने लोटांगण घातले; मात्र कुणीतरी पोलिसांना कळवल्यामुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले; मात्र तेथेही हिंदूंच्याच संघटनशक्तीचा आविष्कार पहायला मिळाला. यामुळे हतबल होऊन पोलिसांनीही माघार घेत हिंदु युवतीला तिच्या वडिलांच्या कह्यात दिले. लव्ह जिहादला विरोध दर्शवण्यासाठी नुकताच कराड येथे जैन संघटना, हिंदु संघटना, काही राजकीय पक्ष यांच्या वतीने महामूकमोर्चा काढण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *