उस्मानिया विद्यापिठाचा हिंदुद्वेष !
भाग्यनगर – उस्मानिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांचा एक गट, काही शिक्षक, मानवाधिकारवाले आणि शहरातील इतर विद्यापिठांतील काही विद्यार्थी यांनी १० डिसेंबरला मानवाधिकार दिनी उस्मानिया विद्यापिठामध्ये गोमांस मेजवानीचे आयोजन केले आहे. त्यामुळे उस्मानिया विद्यापीठ परत एकदा वादाचे केंद्र ठरणार आहे. भारतातील काही राजकीय नेते, लेखक, बुद्धिवादी या मेजवानीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अरूंधती रॉय, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि तमिळनाडूतील व्ही.सी.के. पक्षाचे नेते थोल तिरुमवलावन् यांना मेजवानीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे, असे या उत्सवाच्या आयोजकांनी सांगितले.
वर्ष २०११ मध्ये उस्मानिया विद्यापिठाने अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी सुमारे १०० जणांना गोमांस बिर्याणीची मेजवानी देण्यात आली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न त्या वेळी केला होता. गोमांस हे बर्याच जणांचे अन्न आहे; मात्र हल्ली गोमांस हे आरोग्यासाठी अपायकारक असल्याची चर्चा घडवून आणली जात आहे, असे उस्मानिया विद्यापिठाचे रीसर्च स्कॉलर बी. सुदर्शन् यांनी सांगितले. अन्न भक्षणाचा अधिकार हा मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचे दाखवण्यासाठी १० डिसेंबर या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापिठाच्या आवारात आयोजित करण्यात येणार्या या कार्यक्रमात सहभागी होणार्यांना शिजवलेले गोमांस आणि गोमांस बिर्याणी देण्यात येणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात