Menu Close

वाराणसी येथील हिंदु युवा वाहिनीचे राज्य उपाध्यक्ष मनीष पांडे यांना मारहाण !

हिंदूंनो, अशा आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

manish_pande
श्री. मनीष पांडे

वाराणसी : हिंदु युवा वाहिनीचे उत्तरप्रदेश राज्याचे उपाध्यक्ष श्री. मनीष पांडे यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याची घटना ३१ मे या दिवशी घडली. हे आक्रमण भूमीच्या प्रकरणावरून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आक्रमण करणार्‍यांनी या वेळी श्री. पांडे यांच्याकडील २५ सहस्र रुपयेही लुटले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. त्यांनी श्री. पांडे यांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी श्री. पांडे यांच्या माहितीवरून शानू खान, विकास श्रीवास्तव, गोलू यादव आणि काही अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हिंदु युवा वाहिनीकडून मारहाणीच्या विरोधात आंदोलन !

या मारहाणीच्या विरोधात २ जून या दिवशी हिंदु युवा वाहिनी आणि विश्‍व हिंदु महासंघ यांच्याकडून निषेध मोर्चा काढून पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. आक्रमणकर्त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली. कारवाई न झाल्यास संघटनेकडून मोठे आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *