Menu Close

म्हापसा (गोवा) येथील नागरिकांनी इमारतीत बिलिव्हर्सना रोखले !

उद्दाम बिलिव्हर्सवाले ! त्यांना आता प्रशासनाचाही धाक राहिलेला नाही, हेच यावरून लक्षात येते !

उपजिल्हाधिकार्‍यांसमोर सुनावणी चालू असतांनाही प्रार्थना चालू ठेवल्याने संताप

religious_conversionम्हापसा : फेअर, आल्तो, म्हापसा येथील देशमुख आर्केड को-ऑप हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी इमारतीत गेली दोन वर्षे अनधिकृतरित्या चालू असलेली बिलिव्हर्सची प्रार्थना रविवार, २९ मे या दिवशी रोखली. या वेळी काही काळ तणाव निर्माण झाला; परंतु नागरिकांनी बिलिव्हर्सच्या प्रार्थनांना विरोध कायम ठेवला. (अनधिकृत धर्मांतराला विरोध करणारे आणि उद्दाम बिलिव्हर्सवाल्यांना जशास तसे उत्तर देणार्‍या देशमुख सोसायटीतील नागरिकांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

सविस्तर वृत्त असे की,

१. प्रत्येक रविवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत उपरोल्लेखित सोसायटीच्या एका इमारतीच्या तळमजल्यावरील सभागृहात बिलिव्हर्सच्या प्रार्थना होत असतात.

२. इमारतीचे बांधकाम व्यावसायिक विजय देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे या बिलिव्हर्सच्या प्रार्थना होत असतात.

३. विशेष म्हणजे देशमुख सोसायटी ही पूर्णत: निवासी स्वरूपाची असूनही, तसेच सोसायटीत रहाणार्‍या नागरिकांचा विरोध असूनही या ठिकाणी या प्रार्थना होत असतात. या प्रार्थनांना सुमारे ३० ते ४० लोक जमतात.

४. बांधकाम व्यावसायिक देशमुख यांनी प्रार्थना घेण्यासाठी लागणारी संबंधित अधिकार्‍यांची अनुमती घेतलेली नाही. (दोन वर्षे प्रार्थना अनधिकृत चालू असतांना प्रशासन काय करत होते ? कर्तव्यात चुकारपणा करणार्‍या या अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

५. रविवार, २९ मे या दिवशी अशाच प्रकारे सकाळी ९ वाजता बिलिव्हर्सची प्रार्थना चालू होण्यापूर्वी इमारतीतील नागरिकांनी इमारतीच्या दरवाजाला टाळे ठोकल्याने बिलिव्हर्सना प्रार्थना घेता आली नाही.

६. यामुळे संतप्त बिलिव्हर्सनी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी पोलिसांचे साहाय्य घेतले. या वेळी घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला; मात्र इमारतीतील नागरिकांनी दरवाजाचे टाळे उघडले नाही. यामुळे बिलिव्हर्सची प्रार्थना होऊ शकली नाही.

७. या प्रकरणी स्थानिक नागरिक अशोक बाणावलीकर यांनी आरोप केला की, बांधकाम व्यावसायिक देशमुख हे त्यांनी केलेले अनधिकृत बांधकाम लपवण्यासाठी, तसेच लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी बिलिव्हर्सचे साहाय्य घेत आहेत.

८. बिलिव्हर्सच्या या प्रार्थनांना अनुसरून उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्याकडे सुनावणी चालू असतांना आणि प्रार्थनांसाठी स्थगिती आदेश असतांना ही प्रार्थना चालू ठेवल्याचे बाणावलीकर यांनी सांगितले.

९. या वेळी इमारतीतील नागरिक श्री. सिद्धार्थ कांबळी, सौ. नीता बाणावलीकर, सौ. अखिला परब आणि सौ. मीता नाईक यांनी पत्रकारांकडे इमारतीतील नागरिकांची ग्राह्य बाजू मांडली.

म्हापसा पोलिसांची कारवाई करण्यास टाळाटाळ !

हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात खुट्ट झाले, तरी चवताळून उठणारे पोलीस बिलिव्हर्सवाल्यांच्या विरोधात कारवाई का करत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

देशमुख आर्केड को-ऑप हाऊसिंग सोसायटीत चालत असलेल्या बिलिव्हर्सच्या प्रार्थनांना अनुसरून म्हापसा पोलिसांनी चौकशी करून एक अहवाल म्हापसा येथील उपजिल्हाधिकार्‍यांना फेब्रुवारी मासात सुपुर्द केला होता. या अहवालात इमारतीत प्रत्येक रविवारी बिलिव्हर्सच्या प्रार्थना बांधकाम व्यावसायिक विजय देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे चालत असल्याचे आणि त्याला इमारतीतील रहिवाशांचा विरोध असल्याचे म्हटले आहे.

या प्रार्थना करण्यासाठी कोणत्याही अधिकार्‍याकडून अनुमती न घेतल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाल्याचे या अहवालात म्हटले आहे आणि हा प्रकार गेली दोन वर्षे चालू असल्याचेही यात म्हटले आहे; मात्र यासंबंधीच्या तक्रारीत कोणताही दखलपात्र गुन्हा झालेला नसल्याचे अहवालात शेवटी म्हटले आहे. (दोन वर्षे प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक चालू असूनही गुन्हा दाखल न होणे, हे प्रशासनाचे अपयश कि बिलिव्हर्सवाल्यांचे राजकीय वजन ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *