Menu Close

मध्यप्रदेशातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गणिताची भीती घालवण्यासाठी वैदिक गणिताचे घेण्यात येत आहे साहाय्य !

हिंदु धर्माची देणगी असलेल्या वेदांचे वैज्ञानिक महत्त्व !

vaidic_mathesभोपाळ : मध्यप्रदेश राज्यातील विद्यार्थ्यांची गणित आणि भाषेच्या विषयांमध्ये असलेली कामगिरी राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे समोर आले आहे. एनसीईआरटी या राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात ही माहिती समोर आली. या पार्श्‍वभूमीवर आणि मुलांना असलेली गणिताची भीती दूर करण्यासाठी भोपाळमध्ये नुकतेच वैदिक गणिताचे आठवडाभराचे एक शिबीर भरवण्यात आले होते.

भोपाळ शहरातील सेंट जोसेफ कॉन्वेंट शाळेत झालेल्या या शिबीराला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मिळून २९५ जण सहभागी झाले होते. या संदर्भात बोलतांना वैदिक गणिताचे तज्ञ विनय नायर म्हणाले की, वैदिक गणितामुळे बीजगणितातील किचकट वाटणारी समीकरणे काही सेकंदात सोडवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. तसेच वैदिक गणितातील युक्त्यांमुळे गणिते लवकर सोडवण्याबरोबरच मुलांमध्ये असलेल्या गणिताचे भय नष्ट होते. (वेदांना थोतांड म्हणणारे पुरोगामी आता गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

वैदिक गणित (वेदिक मॅथेमॅटिक्स) म्हणजे काय ?

२० व्या शतकात जगद्गुरु शंकराचार्य भारती कृष्णतीर्थ महाराजांनी गणिताची १६ सूत्रे सिद्ध केली. त्यांनी वेदांमधून ही सूत्रे तयार केली. गणितातील क्लिष्ट समीकरणे चुटकीसरशी सोडवण्यात यश येत असल्याचे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या या शोधाला वैदिक गणित असे नामकरण करण्यात आले. त्यामुळे शंकराचार्य भारती कृष्णतीर्थ महाराजांना वैदिक गणिताचे जनक मानले जाते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *