Menu Close

आयसिसचा इस्लामशी संबंध मान्य करायला हवा : धर्म व नीतीशास्त्र प्रमुख, बीबीसी

isis_groupलंडन : इस्लामिक स्टेट (आयसिस) ही दहशतवादी संघटना काही यहुदी धर्माचा प्रसार करत नसून, ती इस्लाम धर्माशी जोडलेली आहे हे ‘गैरसोयीचे’ सत्य मान्य करण्याची वेळ आली असल्याचे बीबीसीच्या धर्म व नीतीशास्त्र प्रमुखांनी म्हटले आहे. आयसिस या दहशतवादी गटाला ‘इस्लामशी काही देणेघेणे नाही’ असे समजणे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत बीबीसीमध्ये या विभागाचे प्रमुखपद भूषवणारे पहिले मुस्लीम व्यक्ती असलेले प्रा. आकील अहमद यांनी व्यक्त केले आहे.

आयसिसला इस्लामशी काही देणेघेणे नसल्याचे अनेक लोकांना म्हणताना मी ऐकतो, पण तसे मुळीच नाही. ते काही ज्यू धर्माचा प्रचार करत नाहीयेत. हे कदाचित चुकीचे असेल, परंतु ते जे काही सांगतात ते इस्लामी सिद्धांताच्या कुठल्या तरी प्रकारावर आधारित विचारधारा आहे, असे अहमद यांनी गेल्या आठवड्यात सांगितले.

‘लॅपिडो’ पत्रकारितेतील धार्मिक साक्षरतेचे केंद्र असलेल्या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात मुस्लिमांच्या प्रश्नांबाबत बीबीसीच्या भूमिकेबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ते (आयसिस) मुसलमान आहेत. ही वस्तुस्थिती असून हे आपण मान्य करायला हवे. बहुसंख्य मुस्लीम त्यांच्याशी सहमत नसल्यामुळे अनेक पत्रकारांना हे समजून घेण्यात अडचण येते, असे अहमद म्हणाले.

संदर्भ : लोकसत्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *