आमदार टी. राजा सिंह यांचा आदर्श इतरही लोकप्रतिनिधींनी घ्यावा !
तेलंगणच्या उस्मानिया विश्वविद्यालयामध्ये आयोजित गोमांस मेजवानीचे प्रकरण प्रखर हिंदुत्ववादी आणि भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांची उस्मानिया विश्वविद्यालयाच्या उपकुलगुरूंकडे निवेदनाद्वारे मागणी
भाग्यनगर – येथील उस्मानिया विश्वविद्यालयामध्ये होणार्या गोमांस मेजवानीच्या विरोधात येथील प्रखर हिंदुत्ववादी आणि भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी विश्वविद्यालयाच्या उपकुलगुरु श्रीमती रंजीव आचार्य यांना निवेदन दिले. या निवेदनात मेजवानीचे आयोजन करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विश्वविद्यालयाच्या परिसरात गोमांसाचे भक्षण करणे, विश्वविद्यालयाच्या परंपरेच्या विरुद्ध आहे. वर्ष २०१२ मध्येही अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. विश्वविद्यालयालाही हानी पोहोचली होती, असेही या निवेदनात म्हटले आहे. उस्मानिया विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट, काही शिक्षक, मानवाधिकारवाले आणि शहरातील इतर महाविद्यालयांचे काही विद्यार्थी यांनी १० डिसेंबर या दिवशी मानवाधिकारदिनी विश्वविद्यालयात गोमांस मेजवानीचे आयोजन केले आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना टी. राजा सिंह म्हणाले, ‘दादरीसारख्या गोष्टी पुन्हा घडू नयेत, यासाठी तेलंगणमध्ये राज्यशासनाने अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवू नयेत’. हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन म्हणाले, ‘सर्व दृष्टीकोनातून गोमाता महत्त्वपूर्ण आहे. अमेरिकेतील एका संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनात गोमातेच्या दूधाचे महत्त्व समोर आले आहे’.
गोमांस मेजवानीच्या विरोधात ५ डिसेंबरला हिंदुत्ववाद्यांचे भाग्यनगर येथे आंदोलन !
हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या बैठकीत धर्माभिमान्यांनी ‘ १० डिसेंबरला उस्मानिया विद्यापिठात आयोजित करण्यात आलेली गोमांस मेजवानी आणि यंदा तेलंगण शासनाने शासकीय खर्चातून ख्रिसमस साजरा करण्याचा घेतलेला निर्णय’ यांसंदर्भात चर्चा केली. हे दोन्ही निर्णय हिंदुविरोधी असून त्याच्या निषेधार्थ ५ डिसेंबरला भाग्यनगरमधील धरणे चौकात आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात