टीका :
‘सनातन हिंदु धर्मात पूर्णतः परिवर्तन झाले पाहिजे.’ – रॉयिस्ट तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (घनगर्जित, जानेवारी २००९)
खंडण :
‘संपूर्ण जगाला वंदनीय असलेला हिंदु धर्म हा अनादि आहे. वेदांपासून ते अनेक साधू-संत, ऋषी-मुनी आणि तत्त्वज्ञ अशा अनेकांनी लिहिलेल्या वाङ्मयातून हिंदु धर्माचे अद्वितीयत्व विषद झाले आहे. आजवर हिंदु धर्मातील मूल्यांमध्ये परिवर्तन घडवू पहाणा-या व्यक्तीच्या विचारांमध्ये चैतन्य नसल्याने ते काही दिवसांपेक्षा अधिक काळ टिकवू शकले नाहीत ! वास्तविक अशा या महान हिंदु धर्मातील मूल्यांमध्ये परिवर्तन आणावेसे वाटण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदूंचे धर्माविषयीचे घोर अज्ञान !
आणखी एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे हिंदु धर्मातील शाश्वत तत्त्वज्ञानाच्या अंगोपांगांची जाणीव असलेले आणि त्याविषयी अनुभूती घेतलेले संत हेच खरे धर्माधिकारी असल्याने त्यांना धर्मविषयक मूल्यांमध्ये, मूलभूत विचारसरणीत नाही, तर आचारधर्मात काळाला अनुसरून थोडेफार परिवर्तन करणे शक्य असते. भागवतकार व्यासांनी भविष्यात काय स्थिती असणार आहे, लोकांचे रहाणीमान, त्यांची वृत्ती आदींविषयी सविस्तर वर्णन केलेले आहे. इतकी दीर्घदृष्टी त्यांच्यामध्ये होती. अशी ही दीर्घदृष्टी जोशी यांच्याजवळ आहे का ? मग त्यांनी पात्रता नसतांना अशा प्रकारची उथळ वक्तव्ये का करावीत ?’ – प.पू. पांडे महाराज