Menu Close

हिंदु धर्म स्त्रीचा आदर करत असतांना ‘हिंदु धर्मात स्त्रीला दुय्यम स्थान आहे’, असे म्हणणे, हा खोटारडेपणा !

स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या नावावर हिंदु धर्मावर टीका करणाऱ्या धर्मद्रोही साहित्यिका नीरजा !

‘मुंबई येथील साहित्यिका नीरजा यांनी श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्था आणि कला अन् संस्कृती संचालनालय यांनी फोंडा, गोवा येथील विद्याप्रसारक मंडळाच्या सभागृहात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या नावाखाली हिंदूंचा धर्मग्रंथ, रूढी आणि परंपरा यांवर टीका केली. त्यांनी केलेली टीका आणि त्याचे खंडन येथे देत आहोत.

१. हिंदु धर्म स्त्रीचा आदर करत असतांना ‘हिंदु धर्मात स्त्रीला दुय्यम स्थान आहे’, असे म्हणणे, हा खोटारडेपणा !

अ. टीका : मी हिंदु धर्मग्रंथांबरोबरच बायबल, कुराण या सर्व धार्मिक ग्रंथांचे वाचन केलेले आहे. या सर्व धर्मांमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिलेले आहे. महिलेला स्वातंत्र्य दिलेले नाही.

खंडण : हिंदु धर्माने स्त्रीला जेवढे स्वातंत्र्य दिलेले आहे, तेवढे कुठल्याही धर्माने दिलेले नाही. किंबहुना नीरजा यांना असे बोलण्याचे धाडसही हिंदु धर्माने महिलांना दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच होते आहे. सध्या जे स्वातंत्र्याच्या नावाखाली चाळे चालतात, तो स्वैराचार आहे. हिंदु धर्मात स्त्रीला मर्यादेने कसे वागायचे, हे तिच्याच भल्यासाठी सांगितलेले आहे. याउलट मुसलमान पंथात स्त्रियांना बुरखा घालण्यास आणि पुरुषांना अनेक विवाह करण्यास मुभा दिली आहे ! नीरजा हा भाग न सांगता केवळ सवंग प्रसिद्धीसाठी महिलांची दिशाभूल करत आहेत.

आ. टीका : स्त्रीच्या गर्भातून उत्पत्ती होत असली, तरी धर्माने पुरुषालाच वर्चस्व दिलेले आहे. पुराण काळात स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते.

खंडण : पूर्वीच्या काळात अरुंधती, गार्गी आणि मैत्रेयी यांसारख्या महिला वेदशास्त्र पारंगत होत्या. त्याकाळच्या स्त्रिया युद्धातील डावपेचांबरोबरच विविध शस्त्रे चालवण्यातही निपूण असत. मध्यप्रदेशची राणी दुर्गावती, कर्नाटकची राणी चेन्नम्मा, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी रणांगणावर युद्धही केले. यावरून पूर्वीच्या काळी स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते, असे म्हणणे हास्यास्पद आहे. तसेच पुराणकाळात स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते, हा प्रचार इंग्रजांनी केला आणि नको तेवढे स्वातंत्र्य देणारी पाश्चात्त्य संस्कृती लादून भारतीय स्त्रियांना स्वैराचारी बनवले.

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *