Menu Close

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. याला पूर्णतः प्रशासन जबाबदार आहे. विशाळगडावर झालेली अतिक्रमणे, देवतांची मंदिरे-राष्ट्रपुरुषांच्या समाध्या यांची दुरावस्था याकडे पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. तसेच या संदर्भात अनेक आंदोलने झाली, निवेदने दिली गेली, विधानसभा अधिवेशन काळात सातत्याने हा विषय विधीमंडळात लावून धरण्यात आला, कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांकडे अनेकदा बैठका घेण्यात आल्या; मात्र अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा संतापाचा उद्रेक झाला. मात्र आंदोलन करणार्‍या गड-दुर्ग प्रेमींवर दरोड्यासारखी कलमे लावली गेली आहेत, तसेच अनेक निरपराध हिंदूंना अटक करण्यात आली आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची चालू झालेली मोहिम सर्व अतिक्रमणे हटवूनच पूर्ण करण्यासाठी आणि शिवप्रेमी अन् निरपराध हिंदूंवरील अन्याय्य गुन्हे तात्काळ मागे घेण्यासाठी सर्वांनी संगठीत व्हा !

विशाळगडाची झालेली दुरावस्था – सरकार आणि प्रशासन यांची अनास्था

भग्नावस्थेतील मंदिरे

विशाळगडावर असणारी श्री रामलिंग मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री अमृतेश्‍वर मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री विठ्ठलाईदेवी मंदिर, श्री वाघजाईदेवी मंदिर, श्री नृसिंह मंदिर, श्रीराम मंदिर यांसह अनेक छोटी छोटी मंदिरांची अवस्था अतिशय दयनीय असून त्यांच्या जीर्णोद्धाराकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

नरवीरांच्या समाधीची दुरावस्था

स्वराज्यासाठी बलिदान देणार्‍या वीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे या नरवीरांच्या समाधीसाठी पुरातत्व विभागाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. शिवप्रेमींनी स्वखर्चाने समाधीवर छत बांधले. समाधीपर्यंत जाण्यासाठी पायवाट देखील नाही. समाधीविषयी माहिती देणारा साधा फलकही लावलेला नाही.

गडावर अनेक ठिकाणी अस्वच्छता

गडावर अनेक ठिकाणी मद्याच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा आढळून येत आहे. गडावर मद्यबंदी केवळ नावालाच असून प्रशासन काहीच कृती करत नसल्याने विशाळगड संवर्धन समितीकडून विशाळगडाची स्वच्छता करण्यात आली. गडावर पडका राजवाडा आहे. त्या ठिकाणी बाहेरून येणारे पर्यटक पूर्वी शौचासाठी तेथे जायचे. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या ठिकाणची स्वच्छता केली; पण अजूनही पुरातत्व विभागाने या राजवाड्याकडे लक्ष दिले नाही.

अहिल्याबाईची उपेक्षित समाधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई, छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अहिल्याबाई यांचे समाधी वृंदावन. त्या येथे सती गेल्या. त्यांच्या नावाचा साधा फलकही येथे नाही.

श्री वाघजाई मंदिर

श्री वाघजाई मंदिर हे विशाळगडवासियांचे ग्रामदैवत आहे. या मंदिराच्या भिंती आता भूमीपासून केवळ १ फूट शिल्लक असून मंदिरासमोरील एक नक्षीदार खांब आणि देवळात वाघावर स्वार असणारी वाघजाईदेवीची मूर्ती भग्नावस्थेत आहे.

पडझड झालेला पंतप्रतिनिधींचा राजवाडा

गडावर पंतप्रतिनिधींचा राजवाडा म्हणजे एकेकाळचे वैभव. आता याच्या केवळ भिंतीच शिल्लक आहेत. या स्थळांचीही दुरवस्था झाली आहे.

विशाळगडाचा इस्लामीकरण करण्याचा कट

रेहानबाबा दर्गा

इतिहासकारांच्या मते स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी आलेला सरदार ‘मलिक रेहान’ मारला गेला. त्याच्या नावाने (रेहानबाबा) येथे दरवर्षी उरूस भरवला जातो, तसेच रेहानबाबा नावाने मोठा आर्.सी.सी. दर्गा गडावर बांधण्यात आलेला आहे. त्याच्या दर्शनासाठी आणि नवस बोलण्यासाठी प्रतिदिन अनेक लोक येथे येतात.

घोड्याच्या टापेचे पाणी बनले रेहानबाबाचे तीर्थ

श्रीवाघजाई मंदिराच्या समोरच उजव्या हातास एक स्वच्छ पाण्याचा झरा आहे (घोड्याच्या टापेचे पाणी) त्याठिकाणी घोड्याच्या टाप्याच्या आकाराचे नैसर्गिक चिन्ह आहे. पूर्वापार चालत आलेल्या हे चिन्ह एक हिंदु स्मारक असतांना यावर कट्टरतावाद्यांनी अतिक्रमण करून ते रेहानबाबाचे तीर्थ असल्याची खोटी माहिती पर्यटकांना दिली जात आहे.

रेहानबाबा दर्गा रस्ता आणि परिसराचे सुशोभीकरणा

नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू यांच्या समाधीवर साधे छतही नाही. समाधीस्थळाकडे पोहचायला धड पायवाटही नाही. पण रेहानबाबा दर्गा रस्ता आणि परिसर सुशोभीकरणासाठी मात्र १० लाखांचा खर्च.

विशाळगडावरील अनधिकृत बांधकामे

गड पुरातत्व खात्याच्या ताब्यात असूनही गडावर बेघर योजना, इंदिरा आवास योजना, घरकुल योजना, या योजनांतून घरे बांधण्यात आली. येथे वर्ष १९९७ पूर्वी असलेली मंदिरे आणि मशिदी अन् त्यांचे क्षेत्रफळ यांची आताच्या परिस्थितीशी तुलना केली असता त्या ठिकाणी वर्ष २०१५ नंतर मंदिरांची संख्या अल्प झाली असून मशिदींची संख्या आणि क्षेत्रफळ वाढल्याचे दिसते.

आज हे इस्लामीकरण थांबले नाही तर उद्या हा गड किल्ला ए रेहान होईल !

डाउनलोड आणि शेअर करा

विशाळगडाच्या रक्षणासाठी मागण्या

आजपर्यंत विशाळगडावर झालेले अतिक्रमण, मंदिरे-समाध्यांची दुरावस्था याला कारणीभूत असणार्‍या शासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करावी.

पन्हाळा ते विशाळगड हा एकमेवाद्वितीय रणसंग्राम लोकांसमोर येण्यासाठी याचे एक ऐतिहासिक भव्य स्मारक उभारण्यात यावे.

गडाच्या पायथ्यापासून गडाच्या टोकापर्यंत असणारी सर्व मंदिरे, धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे यांचे महत्त्व सांगणारे फलक जागोजागी लावावेत.

गडाचे पावित्र्य भंग करणार्‍या गोष्टींवर (उदा. मद्यपान, मांसविक्री) तसेच आरोग्यास हानी पोचवणार्‍या सर्वच गोष्टींना प्रतिबंध करावा.

गडाची ग्रामदेवता असणार्‍या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्यात यावा.

पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांनी विशाळगडाला सप्ताहातून एकदा भेट द्यावी आणि तेथील अहवाल पारदर्शीपणे शासनाला सादर करावा.

हिंदु जनजागृती समितीचे प्रयत्न

विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरांची दूरवस्था, तसेच या संदर्भातील प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी कोल्हापूर येथे १४ मार्च २०२१ या दिवशी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने निवेदन, आंदोलन, तसेच विविध मार्गांने जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले.

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती आणि ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी आमदारांना निवेदने देण्यात आली. तसेच मुख्यमंत्री आणि संस्कृतीमंत्री यांनाही याविषयी बैठक घेण्याविषयी पत्र दिले.

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे घंटानाद आंदोलन केले. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली दादर (पश्चिम) येथे हे मूकनिदर्शने करण्यात आली.

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भट घेऊन त्यांना गडदुर्गांच्या संवर्धन आणि अतिक्रमणा संदर्भात निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी गडदुर्गांचे संवर्धन करण्याविषयी समयमर्यादा ठरवून प्रशासनाने निर्णय घ्यावेत, तसेच गडदुर्गांवर झालेली अतिक्रमणे हटवण्यात यावीत, असा आदेश दिला.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीच्या ने त्यांचे मत मांडले.

पुणे येथे पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांची ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने भेट घेतली आणि निवेदन दिले. 

संबंधित बातम्या

1998

पुरातत्व विभागाने विशाळगड नियंत्रणात घेतला

विशाळगड पुरातत्व विभागाने स्वतःच्या नियंत्रणात घेतला. 

1998
2008

हिंदु जनजागृती समितीने गडावर लावलेल्या फलकाला धर्मांधांनी काळे फासणे

हिंदु जनजागृती समितीने हिंंदूंना गडावरील ऐतिहासिक वारसा लक्षात यावा, यासाठी एक फलक लावला होता. फलकाच्या उद्घाटनाच्या आदल्या रात्रीच काही धर्मांधांनी फलकाला काळे फासले ! प्रशासनाने त्या धर्मांधांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र पोलीस प्रशासन आणि वनविभाग यांनी समितीच्या कार्यकर्त्यांनाच नाहक त्रास दिला.

2008
2008

प्रशासनाची निष्क्रियता

गडावर होणारे अतिक्रमण आणि अवैध व्यवसाय या संदर्भात स्थानिक अन् हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वेळोवेळी आवाज उठवला; पण प्रशासनाकडून अतिक्रमण आणि अवैध व्यवसाय यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

2008
जानेवारी 2016

पुरातत्व विभागाने अवैध बांधकाम न पाडता केवळ आक्षेप घेणे

माहितीच्या अधिकारात मिळालेल्या पत्रामध्ये ‘या गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बांधकामे झाली आहेत’ असे पुरातत्व खात्याने मान्य केले आहे. या अतिक्रमणास ‘ग्रामपंचायत गजापूर विशाळगड’ यांच्याकडून बांधकामास देण्यात आलेली अनुमती अवैध असल्याचे नमूद केले आहे, तसेच ‘ही बांधकामे त्वरित काढून घ्यावीत’ असेही नमूद केले आहे आणि यापुढे परवानगी देण्यात येऊ नये, असे पत्र पुरातत्व विभागाने ग्रामपंचायत, कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि शाहूवाडी तहसीलदार यांना पाठवले आहे.

जानेवारी 2016
१४ मे २०१८

Timeline Heading

‘हिंदु विधीज्ञ परिषदेचे’ राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी विशाळगडावर होणार्‍या अतिक्रमणाविषयी साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांच्याकडे माहिती अधिकाराच्या अंतर्गत अर्ज केला. यात त्यांनी ‘कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या अखत्यारीत असलेले किल्ले आणि त्यासमवेत असलेल्या किल्ल्यांवर अतिक्रमण झाले आहे का ?’, असे विचारले. तसेच अतिक्रमण झाले असल्यास ते हटवण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाशी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती मागितली.

१४ मे २०१८
१६ मे २०१८

Timeline Heading

अधिवक्ता इचलकरंजीकर यांच्या अर्जाला साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांच्याकडून उत्तर मिळाले. या उत्तरात ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात या विभागाच्या अखत्यारीत विशाळगड, भुदरगड आणि रांगणा हे किल्ले असून भुदरगड अन् रांगणा या किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झालेले नाही. किल्ले विशाळगड येथे असलेले अतिक्रमण हे हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित होण्यापूर्वीचे आहे. येथील अतिक्रमण काढण्याविषयी या विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही.

१६ मे २०१८
२२ मे २०१८

Timeline Heading

‘साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग’, पुणे यांच्याकडे माहिती अधिकाराच्या अंतर्गत अर्ज केला. यात विशाळगड किल्ला राज्य पुरातत्व विभागाने कह्यात घेतला, त्या आदेशाची प्रत आणि विशाळगड किल्ला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्याच्या वेळीचा नकाशा त्या वेळीच्या बांधकामासहित मागवला.

२२ मे २०१८
६ जुलै २०१८

Timeline Heading

पुरातत्व विभागाने उत्तर देतांना सांगितले, ‘विशाळगड किल्ला कोणत्या आदेशाने कह्यात घेतला आणि त्याची माहिती, तसेच गडाचा एक नकाशा पाठवला आहे.’ ज्यामधून काहीच स्पष्ट होते नव्हते.

६ जुलै २०१८
सप्टेंबर 2018

Timeline Heading 5

किल्ले विशाळगड येथे वर्ष १९७२ पासून बांधकामाच्या अनुमतीसाठी करण्यात आलेले अर्ज, त्यासमवेत जोडण्यात आलेली कागदपत्रे आणि त्याच्यावर करण्यात आलेली कारवाई यांविषयी माहिती मागितली. मिळालेल्या माहितीनुसार विशाळगड येथे वर्ष १९९७ पूर्वी असलेली मंदिरे आणि मशिदी अन् त्यांचे क्षेत्रफळ यांची आताच्या परिस्थितीशी तुलना केली असता त्या ठिकाणी वर्ष २०१५ नंतर मंदिरांची संख्या अल्प झाली असून मशिदींची संख्या आणि क्षेत्रफळ वाढल्याचे दिसते.

सप्टेंबर 2018
सप्टेंबर २०१८

Timeline Heading

‘हिंदु विधीज्ञ परिषदेचे’ राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पुन्हा एकदा पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून कह्यात घेतलेल्या सर्व वास्तूंची माहिती, शिक्षण विभागाची शासकीय अधिसूचना क्रमांक ए.एन्.एम्.१०६९/७४५७५/उ या अधिसूचनेची प्रत आणि विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याचे दायित्व असलेल्या शासकीय कार्यालयाची माहिती मागवली. 

सप्टेंबर २०१८
ऑक्टोबर २०१८

Timeline Heading

पुरातत्व विभागाने यावर उत्तर दिले यावरून असे लक्षात येते, विशाळगड कह्यात घेण्यासंदर्भात १३ जून १९७४ या दिवशीच्या आदेशानुसार बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधीस्थळे आणि वृंदावने इतकाच भाग कह्यात घेण्यात आला होता. त्याच्यानंतर ८ जानेवारी १९९७ या दिवशी दुसरा आदेश काढून संपूर्ण विशाळगडच पुरातत्व विभागाने त्यांच्या कह्यात घेतला आहे.

ऑक्टोबर २०१८
१४ मार्च २०२१

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना

विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरांची दूरवस्था, तसेच या संदर्भातील प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी कोल्हापूर येथे ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने निवेदन, आंदोलन, तसेच विविध मार्गांने जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले.

१४ मार्च २०२१
१६ मार्च 2021

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची चेतावणी

‘इस्लामी अतिक्रमणे प्रशासनाने येत्या १ मासात त्वरित न हटवल्यास या विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल’, अशी चेतावणी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

१६ मार्च 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *