पद्मवति फिल्म पुरी सावधानी से जांची जायेगी – सेन्सॉर बोर्ड
हिन्दू जनजागृति समिति के प्रतिनिधी मंडल ने आज मुंबर्इ में फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड के (सेन्सॉर बोर्ड के) मुख्य कार्यलय मे जाकर ‘पद्मावती’ फिल्म के विरोध में ज्ञापन दिया । इस वक्त सेन्सॉर बोर्ड के विभागीय (रिजनल) अधिकारी श्री. राजू वैद्य इन्हे ज्ञापन का स्वीकार किया । इस समय ‘पद्मावती’ फिल्म के संदर्भ मे समाजभावना उग्र है । इस फिल्म को सेन्सॉर सर्टिफिकेट देने से पूर्व भन्साली इन्हे हिन्दू संघटनांआे के प्रतिनिधींआें यह फिल्म दिखाकर सभी विवादो का समाधान करके ले । उसके उपरांतही फिल्म को सर्टिफिकेट दिया जाय । एेसी मांग इस समय की गर्इ। श्री. वैद्य जी ने कहा की , यह फिल्म हमारे पास सर्टिफिकेट के लिए आयी नही है । जब यह फिल्म हमारे पास आयेगी तब पुरी सावधानी से जाची जायेगी । इस प्रतिनिधी मंडल में हिन्दू जनजागृति समिति के प्रवक्ता श्री. सतिश कोचरेकर, सनातन संस्था की प्रवक्ता सौ. नयना भगत तथा हिन्दू जनजागृति समिति के श्री. चंद्रकांत भदिर्के उपस्थित थे ।
प्रति,
मा. अध्यक्ष,
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ,
मुंबई.
विषय : ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटातील आक्षेपार्ह गोष्टी वगळाव्यात, तोवर या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये अन्यथा त्यामुळे समाज प्रक्षुब्ध झाल्यास त्याची जबाबदारी सेन्सॉर बोर्डालाही घ्यावी लागेल !
महोदय,
‘पद्मावती’ हा संजय लीला भन्साळी यांचा आगामी हिंदी चित्रपट १ डिसेंबर २०१७ यादिवशी प्रदर्शित होत आहे.यापूर्वी वादात सापडलेल्या अनेक चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही भारतीय संस्कृती, परंपरा, सभ्यता, आदर्श महापुरूष-वीरांगणा यांचा अपमान, तसेच हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे,असे आतापर्यंत आलेल्या ट्रेलरद्वारे दिसून येते. असे करून भन्साळी यांनी कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटाविषयी विविध हिंदु संघटनांनी अनेक आक्षेप घेतले आहेत. या आक्षेपांचा चित्रपट परिनिरीक्षण करतांना गांभीर्याने विचार व्हायला हवा. या चित्रपटातील कोणत्याही प्रसंगामुळे समाज स्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची काळजी सेन्सॉर बोर्डाने घ्यायला हवी. हा चित्रपट आणि भन्साळी यांच्याविषयी काही सूत्रे पुढे देत आहोत.
१. प्राचीन काळी हिंदु परिवारातील कुलीन स्त्रिया या समाजापुढे नाचगाणे करत नसत, तर त्या प्रसंगी हातात समशेर घेऊन शत्रूंना नाचायला लावणार्या वीरांगणा होत्या. असा जाज्वल्य आणि पराक्रमाचा थोर इतिहास असतांना त्यात मोडतोड करून संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावती’ चित्रपटातील ‘घूमर’ या गाण्यात महाराणी पद्मावतीला नाचतांना दाखवले आहे. हा राणी पद्मावती यांचा घोर अपमान आहे. यामुळे राजपूत समाजासह संपूर्ण हिंदु समाजाच्या भावना तीव्र आहेत.
२. भन्साळी यांनी यापूर्वीही ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटात त्यांनी बाजीराव पेशव्यांची पत्नी काशीबाई यांनाही नाचतांना दाखवले होते. राणी पद्मावती असो वा काशीबाई यांचा इतिहासाच्या कोणत्याही ग्रंथांत ‘त्या नाचल्या होत्या’ असा उल्लेख वा पुरावा नसतांना कपोलकल्पित कथा रचून प्रत्यक्ष इतिहासाची मोडतोड केली, हे सर्वथा अयोग्य आहे.
३. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कला स्वातंत्र्य कोणत्याही प्रकारे चित्रपट निर्मात्याला इतिहासात हस्तक्षेप करण्याची मुभा देत नाही. असे केल्यास या घटनादत्त अधिकारांचा गैरवापर आणि भा.द.वि. कलम २९५ अ नुसार दंडनीय गुन्हा आहे.
४. कलेच्या स्वातंत्र्याला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व इतिहासालाही आहे. तितकेच महत्त्व मनावर कोरलेल्या प्रतिमेला, श्रद्धेला, आदराला आहे, हे भन्साळी आणि कला स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
५. ‘घूमर’ हा नाच राजस्थानी संस्कृतीतील एक नृत्यप्रकार आहे आणि तो नाच करणारा एक विशिष्ट समाज आहे.हा नाच कोणत्याही राजकन्या वा राण्या या करत नव्हत्या, हे इतिहासाच्या आधारे चित्रपट बनवणार्या भन्साळी यांनी अभ्यासायला हवे होते किंबहुना त्यांनी ते अभ्यासले असूनही जाणीवपूर्वक मसालेदार चित्रपट बनवण्याच्या नादात असे करत आहेत कि काय, अशी शंका येते.
६. ज्या राणी पद्मावतीने स्वतःच्या शीलरक्षणासाठी ‘जोहार’ (जिवंतपणी अग्नित प्रवेश) केला, अशा सत्शील राणीला सर्वांसमोर नाचतांना दाखवणे, हा राणी पद्मावतीचा घोर अपमान आहे. त्यामुळे राणी पद्मावतीने नाच केलेले काल्पनिक गाणे चित्रपटातून वगळावे, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे.
७. अशा प्रकारे चित्रपटांतील प्रसंग हे लहान मुलांच्या कोवळ्या मनावर कोरले जातात, त्यामुळे भावीपिढी राणी पद्मावती अशा प्रकारे नाच करत होती, हेच लक्षात ठेवेल. यातून आपण आपल्या भावी पिढीवर चुकीचे संस्कार करत आहोत.
८. काही संघटनांचा आक्षेप असाही आहे की, राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यामध्ये काही काल्पनिक प्रसंग दाखवण्यात आले आहेत. याविषयी स्वतः भन्साळी यांनी नुकताच एक व्हीडीओ सादर करून ‘मी राणी पद्मावतीकडून प्रेरित झालो आहे. माझ्या या चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही. केवळ अफवा आहेत’ असे म्हटले आहे. जर हे सत्य असेल, तर भन्साळी यांनी हा चित्रपट हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींना दाखवावा आणि त्यांच्या शंका दूर कराव्यात, इतका सोपा मार्ग आहे. सेन्सॉर बोर्डाने यामध्ये हस्तक्षेप करून भन्साळी यांना असे केल्याशिवाय चित्रपटाला अनुमती देणार नाही, अशी भूमिका घ्यावी. भन्साळी यांनी असे न केल्यास सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये.
९. करनी सेना, अन्य विविध राजपूत संघटना यांनी ‘हा चित्रपट ज्या चित्रपटगृहांत लागेल, त्या चित्रपट मालकांनी त्यांच्या जबाबदारीवर लावावा’, अशी चेतावनी दिली आहे. यातून या चित्रपटाबद्दल समाजभावना किती गंभीर आहेत,हे दिसते. तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कोणत्याही समाजघटकाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, या दृष्टीने सेन्सॉर बोर्डाने अत्यंत जबाबदारीने वरील सूचनांचा विचार करावा आणि या चित्रपटातील आक्षेपांचे निरसन करावे.
जर या आक्षेपांचे निरसन न करता हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यामुळे समाज प्रक्षुब्ध झाल्यास त्याला सेन्सॉर बोर्डालाही त्याची जबाबदारी राहील.
आपला नम्र,
प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,