श्रीपाद श्रीवल्लभ


श्रीदत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. या पार्श्वभूमीवर श्रीगणेश चतुथीर्च्या निमित्ताने श्रीपाद श्रीवल्लभांच्या अलौकिक कार्याचा तसेच पीठापूरम या त्यांच्या जन्मक्षेत्रांचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला श्रीगणेश आणि भगवान दत्तात्रेयांचा आद्य अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ या दोघांचाही जन्म भादपद शुल्क चतुथीर्चा. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही शक्ती सार्मथ्याच्या पलिकडे असलेले विशिष्ट चतुर्थतत्व ज्यांना ज्ञात आहे असे ”परमात्मा” म्हणून या दोघांचा उल्लेख केला जातो. गणपती अथर्वशीर्षामध्ये सत्व, रज आणि तम या तीन गुणांपलीकडचा, स्थूल सूक्ष्म आणि आनंद या तीन देहांपलीकडचा आणि भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांच्या पलीकडचा असे श्रीगणेशाचे वर्णन केले आहे. श्रीपाद श्रीवल्लभही श्रीगणेश स्वरूपच असल्याने त्यांनाही हे वर्णन चपखल लागू पडते. भगवान श्री दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२० मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राज शर्मा आणि सुमती या पुण्य दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. सरस्वती गंगाधर रचित ‘श्रीगुरुचरित्र’ या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. दत्तभक्त व सामान्य लोकांना कारंजा क्षेत्राचे श्री नृसिंह सरस्वती आणि अक्कलकोट क्षेत्राचे स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे दोन अवातर चांगले माहीत आहेत. पण पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. या पार्श्वभूमीवर थोडक्यात घेतलेला आढावा उद्बोधक आणि अनेकांच्या माहितीत नव्याने भर टाकणारा ठरेल अशी अपेक्षा आहे.

अप्पल राजन व सुमती या दत्तभक्त दाम्पत्याला ऐकूण चार मुले होती. पण त्यापैकी दोन वारली. तर दुसऱ्या दोघांतील एक अंध व एक पंगू होता. दुदैर्वाच्या अशा दशावराता संसार चालू असता एके दिवशी भर टळटळीत दुपारी एक अतिथी घरासमोर येऊन भीक्षा मागू लागला. त्याच दिवशी या दाम्पत्याच्या घरी श्राद्ध होते. सुमती एकटीच घरात होती.’माते भिक्षा वाढ’ हा आवाज ऐकून ती बाहेर आली. वास्तविक श्राद्धाच्या दिवशी ब्राह्माण जेवून गेल्याशिवाय जेवण वाढता येत नाही अशी पूर्वापार रूढी. पण अतिथी भिक्षीकऱ्याचे तेज:पुंज रूप पाहून सुमती सर्व काही विसरून गेली व तिने भीक्षा घातली. अतिथीने प्रसन्न होऊन पाहिजे ते काहीही मागण्याचा आशीर्वाद दिला. आपल्या दोन्ही मुलांच्या अवस्थेमुळे दु:ळखी असलेल्या सुमतीने ‘आपल्या सारख्याच तेजोमय मुलाची मी अपेक्षा करते’ अशी विनंती केली. यति वेषात आलेल्या ”श्री दत्तात्रेयांनी” माते मीच तुझ्या पोटी जन्म घेईन’ असे सांगितले. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे झालेला मुलगा म्हणजेच दत्तअवतारी श्रीपाद श्रीवल्लभ होत. पिठापुरम येथे १६ तर कुरवपूर येथे १४ वषेर् अशा अवघ्या ३० वर्षांच्या कालावधीत अद्भूत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी इह-पर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भूत आहेत. पुढे जप, तप, ध्यान, तपस्या या सर्वांचे फल स्वत:ला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची आश्वीव्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सहस्त्रपटीने वाढविले. आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलांद्वारे जनता जनर्दानाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य खचीर् घातले. पाण्यावरून चालणे, व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे, उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे, लांबच्या प्रवासातही दूध, दही, लोणी खराब न होता नीट राहणे, अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे, मृत जीवास जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले दिसते. या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत-सज्जनांचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दृष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूत-पिशाच्च बाधांचे निर्मूलन आदि अनेक गोष्टींचा संदेश त्यांनी तत्कालीन समाजाला दिला.

सहाशे नव्वद वर्षांपूवीर् आंध्र प्रदेशातील पीठापुरम येथे या दैवी बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच सकळ शास्त्रात विशेषत: वेदान्दात प्रावीण्य मिळविले. नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले. गोकर्ण महाबळेश्वर बदीनाथ श्रीशैल्य, असे फिरत फिरत व ब्रह्माविद्येचा प्रचार करीत ते कुरवपूर येथे आले. तेथे तपश्चर्या केली. पिठापुरम येथील देखण्या मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूतीर्च्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटते. तेथे भक्तांना अभिषेक करता येतो. मंदिराच्या प्रांगणात औदुंबर वृक्ष असून तेथे दत्तांच्या पादुका आहेत. पीठापुरम या पवित्र तीर्थक्षेत्री अत्यंत प्राचीन असे कुक्कुटेश्वराचे दगडी मंदिर आहे. त्यासमोरच एक तलाव आहे.

गावाबाहेर उंच डोंगरावर अन्नवरम येथे श्री सत्यनारायण मंदिर तसेच अनधालक्ष्मी मंदिर दोन्ही प्रेक्षणीय आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ अश्विन वद्य द्वादशी रोजी देहसमाप्ती करून कुरवपूर येथे कृष्णामाईच्या पात्रात अदृश्य झाले. पिठापुरम हे पूर्वकालापासूनच सिद्ध क्षेत्र आहे! गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ नेला. तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते. तर पाय पीठापूर येथे होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असेही म्हणतात. संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू-माधव, प्रयाग येथे वेणी-माधव, रामेश्वर येथे सेतु- माधव, त्रिवेंदम येथे सुंदर-माधव तर पिठापुरम येथे कुंती -माधव अशी माधवाची पाच मंदिरे आहेत. पांडव माता कुंतीने येथे माधवाची पूजा केली. ते हे स्थान. या स्थानास दक्षिण काशी असेही म्हणतात.

पिठापुरमला कसे जाल?

श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान म्हणून पिठापुरम क्षेत्राचे महत्त्व असाधारण आहे. आंध्रमध्ये हे ठिकाण आहे. मुंबई-पुण्याहून जाणाऱ्यांसाठी कोणार्क एक्स्प्रेस ही गाडी अधिक सोईचा आहे. समालकोट या स्टेशनला उतरावे. तेथून रिक्षाने पिठापुरमला अर्ध्या तासात जाता येते. दुसरा मार्ग म्हणजे प्रथम हैदराबादला जावे. तेथून गोदावरी एक्स्प्रेसने पिठापुरमला जाता येते. इंदूर, भोपाळ आणि नागपूरकडून जाण्याचा मार्ग म्हणजे मदासकडे जाणाऱ्या गाडीने प्रथम विजयवाडा येथे उतरावे. व तेथून वॉल्टेरकडे जाणाऱ्या गाडीने सामलकोट व पिठापुरम या दोन्ही ठिकाणी जाता येते.

Leave a Comment