१. गायीचे दूध-तूपच नाही, तर गोमूत्रही
आरोग्यदायी आणि रोगनाशक असणे
गोसेवेमुळे संतती प्राप्त होते. तसेच शेणाचा खत स्वरूपात उपयोग केल्यास अन्नरूपी लक्ष्मीची प्राप्ती होते. केवळ दूध-तूपच नाही, तर गोमूत्रही आरोग्यदायी आणि रोगनाशक आहे. गायीच्या वंशाविना (बैल) शेतीचे कामकाज अशक्य आहे. गायीचे खूर, चामडी आदींचा उपयोग गाय मृत झाल्यावरही केला जातो. भारतवर्षाचे उज्ज्वल भवितव्य गोवंशाच्या रक्षणावरच आधारित आहे.
२. गोमय मल नाही, तर मलशोधक असणे
गोमयामध्ये लक्ष्मीचा निवास असतो, हे शास्त्रवचन आहे. गोमय मल नाही, तर मलशोधक आहे. प्रदूषण, तसेच अणुकिरणांच्या बचावासाठी गोमय रक्षाकवचाप्रमाणे आहे. गोमय हे उत्तम संपूर्ण खत आहे. गोमयाच्या राखेमुळे मलदुर्गंध नष्ट होतो. याच राखेपासून भांडी स्वच्छ होत असून त्यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होते.
३. गोमय एक शाश्वत ऊर्जा असणे
गोमय एक शाश्वत ऊर्जा आहे. गोमयापासून त्वचारक्षक साबण, धूपबत्ती, तसेच थंडी-उष्णतेपासून अवरोधक प्लास्टरचे उत्पादन होते. गोमयामुळेच नापिक झालेली शेतातील माती पुन्हा लागवडीयोग्य झाल्याचे सप्रमाण सिद्ध झाले आहे.
संदर्भ : विश्व हिंदु परिषदेची दिनदर्शिका – २०१०