१. अत्रीऋषींना खूप ताप चढला असतांना अश्विनीकुमारांनी बर्फलावून त्यांना बरे केले, अशीमाहिती ऋग्वेदात (१-११६-८) आहे. (खूप ताप आल्यावर डोक्यावरबर्फठेवण्याची पद्धतआधुनिक विज्ञानाने १९-२० व्या शतकात शोधली ! )
२. इसवी सन पूर्व चार सहस्र वर्षे या काळी होऊन गेलेले जगातील पहिले शस्त्रकर्मी सुश्रुत हे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आपली आयुधे उकळून घेत असत. (आधुनिक विज्ञानाने याचा शोध सुमारे४०० वर्षांपूर्वी लावला ! )
संदर्भ : वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. ११९ व १५२. लेखक : डॉ. पद्माकर विष्णु वर्तक
मुलांनो, हिंदूंचे वैद्यकशास्त्र हजारो वर्षांपूर्वीचप्रगत होते, हे लक्षात घ्या ! आपले महान पूर्वज, राष्ट्र व संस्कृती यांचा अभिमान बाळगा !