वैदिक कालखंडापासून महाभारताच्या कालखंडापर्यंत पंजाब प्रांताला अपूर्व इतिहासलाभला आहे. सुमारे चारशे वर्षे मोगल सुलतानांनी आक्रमणे करून पंजाब प्रांत अक्षरशःपिळून काढला. पंजाबला वाचवण्यासाठी गुरुनानकांच्या द्रष्टेपणातून शीख संप्रदायनिर्माण झाला. शिखांच्या दहा गुरूंनी या अन्यायी आक्रमणांविरुद्ध तीव्र लढा दिला. गुरुगोविंदसिंह हे शीख संप्रदायाचे दहावे अन् शेवटचे गुरु होत. मार्गशीर्ष कृष्ण पक्षअष्टमी या दिवशी त्यांची जयंती असते. त्यानिमित्ताने त्यांनी मोगलांविरुद्ध दिलेल्या लढ्याविषयीची माहिती पुढे देत आहोत.गुरुगोविंदसिंह यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
१. गुरु गोविंदसिंहांनी औरंगजेबाने आलमपूरला पाठवलेल्या पैंदेखानाच्या कानशिलावरबाण मारून त्याचा वध करणे, औरंगजेबाने आलमपूरला होणारा अन्नपुरवठा बंद करणेअन् शिखांनी त्याचाही कडवेपणाने प्रतिकार करणे
‘गुरु गोविंदसिंहांचे आलमपूर येथे वास्तव्य असतांना औरंगजेबाने पैंदेखान आणिदीनाबेग या दोन सरदारांना सैन्यासह तेथे पाठवले. ‘लढाई शक्यतो आलमपूरमध्ये होऊ द्यायची नाही’, असे त्या दोघांचे धोरण होते. पैंदेखानाला समस्त शिखांनी वाटेत गाठलेआणि त्याच्याशी त्वेषाने युद्ध केले. गुरु गोविंदसिंहांनी पैंदेखानाच्या कानशिलावर बाण मारून त्याचा वध केला. तसेच घायाळ झालेल्या दीनाबेगला पळून जावे लागले.शेवटचा उपाय म्हणून जम्मुरपूर मंडी, भूता कुलू, कैंथल, मुरेल, चंबा, दडवाल आणिश्रीनगर येथील राजांकडून आलमपूरला होणारा अन्नपुरवठा (रसद) बंद करण्याचाप्रयत्न औरंगजेबाने केला; परंतु शिखांनी त्याचाही कडवेपणाने प्रतिकार केला. शेवटी बसाली राजाच्या मध्यस्थीमुळे हे शीतयुद्ध संपुष्टात आले.
२. औरंगजेबाने वजीरखानाच्या नेतृत्वाखाली आनंदपूरला प्रचंड सैन्य पाठवणे, युद्धातअनेक शीख मारले जाणे आणि मोगलांच्या सामथ्र्यापुढे शिखांना माघार घ्यावी लागणे
शिखांचे गुरु शरण येत नाहीत, हे औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्यानेवजीरखानाच्या नेतृत्वाखाली आनंदपूरला अफाट सैन्य पाठवले. त्याला तोंड देतांनाअनेक शीख मारले गेले. शिखांनीही अनेक मोगल सैनिकांना कंठस्नान घातले. त्यावेळी मोगलांचे सामर्थ्य मोठे असल्यामुळे शिखांना माघार घ्यावी लागली.
३. धान्याचा साठा संपल्याने गुरु गोविंदसिंह आणि त्यांचे कुटुंबीय यांना उपासमार सहन करावी लागणे, वजीरखानाने औरंगजेबाच्या सांगण्यावरून आनंदपूरमधील सर्वांना अभय देणे अन् गोविंदसिंहांनी मोगलांच्या वेढ्यातून निसटून जाणे
आनंदपूरला बळकट वेढा पडल्यामुळे काही दिवसांतच तेथे साठवलेले धान्यसंपत आले. उपासमार होऊन चांगले घोडे आणि ‘प्रासादी’ नावाचा प्रख्यात हत्तीही मृत्यूपावला. गुरु गोविंदसिंह आणि त्यांचे कुटुंबीय यांनाही उपासमार सहन करावी लागली;परंतु आनंदपूर सोडून बाहेर जाण्याची त्यांची सिद्धता नव्हती. शेवटी वजीरखानानेऔरंगजेबाच्या सांगण्यावरून आनंदपूरमधील सर्वांना अभय दिले. मोगलांचे वचन फसवेअसते, हे गुरु गोविंदसिंहांना ठाऊक होते. शेवटी ६.१२.१७०५ या रात्री ते आपल्या कुटुंबियांसमवेत वेढ्यातून निसटले. जाण्यापूर्वी जेवढ्या वस्तू नष्ट करता येतील,तेवढ्या त्यांनी नष्ट केल्या.
४. मोगल सेनेने पाठलाग करून किल्ल्याला वेढा देणे, गुरु गोविंदसिंह आणि त्यांचे कुटुंबीय निःशस्त्र असणे, वेढा फोडण्याच्या प्रयत्नांत त्यांच्या दोन पुत्रांना वीरगती प्राप्त होणे आणि साथीदारांशी ताटातूट होऊन गुरु गोविंदसिंह एकटेच पडणे
मोगलांचे सैन्य त्यांचा पाठलाग करत आले आणि ‘शिरसा’ नदीच्या काठावर पहिली चकमक उडाली. भाई उदयसिंह हा प्रख्यात सेनापती या चकमकीत मारला गेला.शिरसा नदी ओलांडून छामकौर येथे पोहोचून गुरु गोविंदसिंह यांनी त्यांच्या कुटुंबियांसह तेथील किल्ल्याचा आश्रय घेतला. मोगल सेनेने पाठलाग करून या किल्ल्यालाही वेढाघातला. तेव्हाची परिस्थिती फार गंभीर होती. गुरु गोविंदसिंह आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याजवळ शस्त्रेही नव्हती, तसेच धनधान्याचा तुटवडा होता. वेढा फोडण्याच्या प्रयत्नांत त्यांचे दोन मोठे पुत्र अजितसिंग आणि झुजरसिंग यांना वीरगती प्राप्त झाली.भाई दयासिंग, धरमसिंग आणि मानसिंग या तीन विश्वासू शिखांसमवेत गुरु गोविंदसिंहवेढ्यातून निघून गेले. शेवटी या तीन शिखांची आणि त्यांची ताटातूट झाली अन् ते एकटेच राहिले. त्यांच्यासमवेत सैन्य, अंगरक्षक, संपत्ती आणि मित्र असे काहीच नव्हते;परंतु त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. ‘मच्छीवारा’ जंगलात त्यांची ससेहोलपट झाली.त्यांच्या अंगावरचे कपडे फाटले, पायात घालायला जोडा राहिला नाही. त्या वेळी उशाशी धोंडा घेऊन ते भूमीवर झोपत असत.
५. सिरहंदच्या नवाबाने गुरु गोविंदसिंहांची पत्नीआणि दोन मुले यांना पकडून त्यांच्यापुढे मृत्यू किंवा धर्मांतर असा पर्याय ठेवणे आणि मुलांनी धर्मांतराला नकार दिल्यावर नवाबाने त्यांना भिंतीत चिणून ठार मारणे
सिरहंदच्या नवाबाने गुरु गोविंदसिंहांची पत्नी गुजरी आणि दोन धाकटी मुले यांनापकडले आणि त्यांच्यापुढे मृत्यू किंवा धर्मांतर असा पर्याय ठेवला. त्या वेळी त्यांचीदोन्ही मुले दहा वर्षांपेक्षाही लहान होती; परंतु त्यांनी धर्मांतराला ठामपणे नकार दिला.नवाब वजीरखानने दोन्ही मुलांना भिंतीत चिणून ठार मारले. या धक्क्याने मुलांची आजीमृत्यू पावली.
६. मुलांच्या मृत्यूने दुःखी झालेल्या मातागुजरीला गुरु गोविंदसिंहांनी दिलेले तेजस्वी उत्तर
चारही मुले मेल्यामुळे माता गुजरीला अतोनात दुःख झाले. असे म्हणतात की,माता गुजरीने गुरु गोविंदसिंहांना ‘‘माझी मुले कुठे आहेत ?’’ असा प्रश्न विचारला होता.त्या वेळी समोर बसलेल्या सर्व शीख शिष्यांकडे बोट दाखवून गुरु गोविंदसिंहांनी तेजस्वी उत्तर दिले, ‘‘ही सर्व तुझीच मुले आहेत !’’
७. बंदासिंगाने सिरहंदवर आक्रमण करणे आणि मोगलांचा पूर्ण पराभव करून वजीरखानाला ठार मारणे
जोरावरसिंग आणि फतेहसिंग या दोघांनाही १२.१२.१७०५ या दिवशी भिंतीतचिरडून मारण्याचा अघोरी प्रकार मोगलांनी केला. यानंतर अवघ्या पाचच वर्षांतबंदासिंगाने सिरहंदवर आक्रमण केले आणि त्याने मोगलांचा पूर्ण पराभव करून वजीरखानाला ठार मारले. या युद्धाच्या कालखंडात गुरु गोविंदसिंहांना स्वातंत्र्यासाठी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आहुती द्यावी लागली.’
संदर्भ : भक्तीकोश