पार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. शंकरप्रगट झाला आणि दर्शन दिले. त्याने पार्वतीशी विवाह करणे स्वीकारले आणि तो अंतर्धान पावला. एवढ्यातकाही अंतरावरील सरोवरात एका मगरीने मुलाला पकडले. मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. पार्वतीनेलक्षपूर्वक ऐकले, तर तो मुलगा अत्यंत दयनीय स्थितीत ओरडत होता, ‘‘वाचवा .. माझे कोणीच नाही .. वाचवा.. !’’ मुलगा ओरडत आहे, आक्रांत करत आहे. पार्वतीचे हृदय द्रवित झाले. ती तेथे पोहोचली. तिने पाहिले,‘एका सुकुमार मुलाचा पाय मगरीने पकडला आहे आणि ती त्याला फरफटत नेत आहे.’ मुलगा आक्रंदत आहे,‘‘माझे या जगी कोणीही नाही. मला ना आई आहे, ना वडील आहेत, ना मित्र आहे. माझे कोणीच नाही. मलावाचवा !’’
पार्वती म्हणाली, ‘‘हे ग्राह ! हे मगरदेवते ! या मुलाला सोडून दे.’’
मगर : दिवसाच्या सहाव्या भागात जो मला मिळतो, त्याला आपला आहार समजून स्वीकार करणे, अशी माझीनियती आहे आणि ब्रह्मदेवाने दिवसाच्या सहाव्या भागात या मुलाला माझ्याकडे पाठवले आहे. आता मी यालाका बरे सोडू ?
पार्वती : हे मगर, तू याला सोडून दे. याच्या मोबदल्यात तुला जे पाहिजे ते घेऊन टाक.
मगर : तू जे तप करून शंकराला प्रसन्न केले आणि वरदान मागितले, त्या तपाचे फळ जर मला देत असशील,तर मी या मुलाला सोडू शकते अन्यथा नाही.
पार्वती : हे काय बोलतेस ! केवळ या जन्माचेच नव्हे, तर कित्येक जन्मांच्या तपश्चर्येचे फळ तुला अर्पणकरण्यासाठी सिद्ध आहे; पण तू या मुलाला सोड.
मगर : विचार कर, आवेशात येऊन संकल्प करू नको.
पार्वती : मी विचार केला आहे.
मगरीने पार्वतीकडून तपदान करण्याचा संकल्प करवला. तपश्चर्येचे दान होताच मगरीचे शरीर तेजाने चमकूलागले. तिने मुलाला सोडून दिले आणि म्हणाली, ‘‘हे पार्वती, तुझ्या तपश्चर्येच्या प्रभावाने माझे शरीर किती सुंदरझाले आहे, जणू मी तेजःपुंज बनले आहे. आपल्या जीवनभराची कमाई तू एका लहानशा मुलाला वाचवण्यासाठीअर्पण केली !’’
पार्वतीने उत्तर दिले, ‘‘ग्राह ! तप तर मी पुन्हा करू शकते; पण या मुलाला तू गिळले असतेस, तर असानिर्दोष मुलगा पुन्हा कसा मिळाला असता ?’’पहाता पहाता तो मुलगा अंतर्धान पावला. मगरीसुद्धा अंतर्धान पावली. पार्वतीने विचार केला, ‘मी माझ्या तपाचेदान केले. आता पुन्हा तप करते.’ पार्वती तप करायला बसली. थोडेसे ध्यान केले, तोच भगवान सांब सदाशिवपुन्हा प्रगट होऊन म्हणाला, ‘‘पार्वती, आता का बरे तप करतेस ?’’ पार्वती म्हणाली, ‘‘प्रभु ! मी तपश्चर्येचे दानकेले आहे.’’
भगवान शंकर म्हणाला, ‘‘पार्वती, मगरीच्या रूपातही मीच होतो आणि मुलाच्या रूपातही मीचहोतो. तुझे चित्त प्राणिमात्रांत आत्मियतेचा अनुभव करते कि नाही, याची परीक्षा घेण्यासाठी मी ही लीला केलीहोती. अनेक रूपांमध्ये दिसणारा मी एकच्या एकच आहे. मी अनेक शरिरांमध्ये, शरिरांहून वेगळा अशरिरीआत्मा आहे. प्राणिमात्रांत आत्मियतेचा तुझा भाव धन्य आहे !’’
संदर्भ : मासिक ऋषीप्रसाद, फेब्रुवारी २००९.