धर्मासाठी भिंतीत चिणून मरण पत्करलेले जोरावरसिंह आणि फतेहसिंह !


फतेहसिंह आणि जाेरावरसिंह

फतेहसिंह आणि जाेरावरसिंह

जोरावरसिंह आणि फतेहसिंह हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे दोन सुपुत्र. गुरु गोविंदसिंह यांनी मोगलांविरुद्ध पुकारलेल्या स्वातंत्र्ययुद्धातील एका लढाईत वडिलांशी ताटातूट झाल्यावर हे दोघे बंधू क्रूरकर्मा औरंगजेबाचा सरहिंद येथील सुभेदार वझीरखान याच्या हाती सापडले. वझीरखान याने त्यांना ‘मुसलमान व्हा, नाहीतर ठार मारू’, असे धमकावले. ही वाक्ये ऐकताच या मुलांनी ‘मेलो तरी चालेल; पण आम्ही धर्म सोडणार नाही ! आमचा धर्म आम्हाला प्राणापेक्षाही प्रिय आहे. आमचे आजोबा गुरु तेगबहादूर यांनी धर्माच्या रक्षणासाठीच प्राणार्पण केले. त्यांचा आदर्श आमच्यासमोर आहे’, असे सांगितले. या बाणेदार उत्तराचा परिणाम व्हायचा तोच झाला. २७.१२.१७०४ या दिवशी या दोघा बंधूंना भिंतीत चिणून ठार मारण्यात आले. या वेळी जोरावरसिंह ८ वर्षांचा, तर फतेहसिंह ५ वर्षांचा होता. जगातील कोणत्याही देशाच्या इतिहासात अशी घटना नाही की, ज्यात ८ अन् ५ वर्षांच्या दोन बालसिंहांनी धर्मासाठी प्राणार्पण केले !

मुलांनो, आपला जन्म हिंदु धर्मात झाला आहे. या धर्मावर आपले प्राणापेक्षाही प्रेम हवे. धर्मावर आपलेे प्रेम असेल, तरच आपण धर्मासाठी त्याग करण्यास सिद्ध होऊ !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘बाेधकथा’

‘बोधकथा’ हा ग्रंथ ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment