पंढरपूरात पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना


पांडुरंगाचे चरण हे समचरण असल्याने त्यांत द्वैत नाही

दिसे सगुण हा स्वरूप सुंदर । परि व्यापूनिया ठेला चराचर ।।

समचरण दृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरि वृत्ति राहो ।।

ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथे अनु नाही विषम ।।

संत म्हणतात,
`हे पांडुरंगा, तुझे चरण हे समचरण आहे. त्यांत द्वैत नाही. अशा या स्वरूपात तू या दोन विटांवर (द्वैतावर) अद्वैत स्वरूपात उभा आहेस.'

`कर्नाटकातील विजयनगरच्या राजाने पांडुरंगाची मूर्ती आपल्या साम्राज्यात आणली व तिची स्थापना तुंगभद्रेच्या तीरावर केली. एकनाथ महाराजांचे आजोबा (भानुदास) हे विठ्ठलाचे भक्‍त होते. त्यांचा अधिकार मोठा होता. एकदा विठ्ठल त्यांना प्रसन्न झाला व त्याने `मी कर्नाटकात आहे. तू मला पंढरपुरात आणून माझी स्थापना कर', असे सांगितले. त्याप्रमाणे भानुदासांनी विजयनगरच्या राजाकडे जाऊन मूर्तीची मागणी केली. राजालाही दृष्टांत झाला. एकनाथ महाराजांच्या आजोबांचे (भानुदासांचे) विठ्ठलप्रेम पाहून त्याने त्यांना ती मूर्ती दिली. त्यांनी ती मूर्ती पंढरपूरला आणून तिची प्रतिष्ठापना केली.'

Leave a Comment