‘लंडनमध्ये एकदा गुप्तचरांनी स्वा. सावरकरांना अडवले आणि म्हटले, ‘‘महाशय, क्षमा करा. आम्हाला तुमच्याविषयी संशय आहे. तुमच्यापाशी घातक हत्यार आहे, अशी निश्चित वार्ता असल्याने तुमची झडती घ्यायची आहे !’’ सावरकर थांबले, गुप्तचरांनी झडती घेतली. काहीच सापडले नाही ! तेव्हा गुप्तचरांचा प्रमुख अधिकारी सावरकरांना म्हणाला, ‘‘क्षमा करा. चुकीच्या वार्तेमुळे तुम्हाला त्रास झाला.’’ सावरकर म्हणाले, ‘‘तुम्हाला मिळालेली वार्ता चुकीची नाही. माझ्यापाशी भयंकर घातक हत्यार आहे.’’ खिशातील झरणी (पेन) दाखवून सावरकर म्हणाले, ‘‘हे पहा, ते हत्यार ! यातून निघणारा एकेक शब्द तरुणांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. या शब्दांनी देशभक्तांचे रक्त सळसळते आणि ते राष्ट्र्रासाठी तळहातावर शिर घेऊन लढण्यास सिद्ध होतात !’’