नवरात्र

मित्रांनो, शास्त्रानुसार नवरात्र उत्सव साजरा करून देवीची कृपा संपादन करूया !

‘विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हिंदु संस्कृतीमध्ये असणारे अनेक सण आणि उत्सव आपण साजरे करतो. उत्सवसाजरे करणे, हा देवाची भक्ती करून आनंदी जीवन जगण्याचा साधा आणि सुलभ मार्ग आहे. प्रत्येकाला देवाची शक्तीआणि अस्तित्व यांची जाणीव व्हावी अन् आपण सर्वांनी आनंदी व्हावे, तसेच आदर्श जीवन जगावे, यासाठी या सर्वउत्सवांची निर्मिती देवाने केली आहे; पण सध्या हे सर्व उत्सव शास्त्रानुसार आणि योग्य पद्धतीने कसे साजरे करावेत अन्यामागचे शास्त्र आम्हाला ठाऊक नाही. त्यामुळे सण आणि उत्सव यांमध्ये अनेक अपप्रकार होत आहेत. या लेखांतून आपण नवरात्र उत्सव साजरा कसा करावा आणि देवतांची कृपा कशी मिळवावी, ते पहाणार आहोत.

१. नवरात्र या सणामागीलशास्त्र

नवरात्रीत आपण महाकाली, महालक्ष्मीआणि महासरस्वतीयांची उपासना करतो. आपण यानऊ दिवसांमध्ये आरंभीचे तीन दिवस महाकाली, नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीआणि शेवटचे तीन दिवस महासरस्वतीयादेवतांची उपासना करतो. आता वेगवेगळ्या देवतांची उपासना करण्यामागील शास्त्र आपण पाहूया.

२. नवरात्रामध्ये नऊ दिवसांत अनुक्रमे महाकाली,
महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवतांची पूजा करण्यामागीलशास्त्र

२ अ. नवरात्रीचे पहिले तीन दिवस महाकालीदेवीची उपासना करण्यामागील शास्त्र

२ अ १. स्वभावदोष आणि दुर्गुण, हे जीवन दुःखी अन् तणावयुक्त बनवणारे शत्रू असणे : आपल्या जीवनातीलसंकटांचे निवारण होऊन शत्रूचा नाश व्हावा, या हेतूने आपण महाकाली या देवतेची उपासना करतो. मित्रांनो, आपल्याविद्यार्थी जीवनात आपले शत्रू कोण आहेत, ज्या शत्रूंमुळे आपले जीवन दुःखी होते आणि आपण तणावयुक्त रहातो ?मित्रांनो, स्वभावदोष आणि दुर्गुण हे आपले शत्रू आहेत. ज्या मुलांमध्ये दुर्गुण अधिक आहेत, ती मुले आनंदी राहू शकतनाहीत. याची उदाहरणे पहा.

२ अ १ अ. भांडखोरपणा : एखाद्या मुलामध्ये भांडखोरपणा हा दोष असेल, तर त्याला पुष्कळ शत्रू असतील. मग हाविद्यार्थी आनंदी राहील का ? म्हणजे याचा मुख्य शत्रू त्याचा ‘भांडखोरपणा’ हा दोष आहे. मित्रांनो, आपले दोषच आपलेशत्रू आहेत त्यांच्या निवारणासाठीच आपण महाकालीदेवीकडे प्रार्थना करूया.

२ अ १ आ. आळस : समजा एखाद्या मुलामध्ये आळस हा दोष आहे, तर तो अभ्यास वेळेवर पूर्ण करणार नाही. त्याच्यामनावर पुष्कळ ताण आणि भीती यांचे दडपण आहे. या मुलाचा शत्रू ‘आळस’ हा दोष आहे.

२ अ २. मुलांनो, स्वभावदोष दूर होण्यासाठी महाकालीमातेला प्रार्थना करा : मित्रांनो, आपल्याला आनंदीजीवनापासून दूर नेणारा शत्रू, म्हणजे आपले स्वभावदोषच आहेत. यासाठी आपण नवरात्रीचे पहिले तीन दिवस महाकालीदेवीलाप्रार्थना करूया, ‘हे महाकालीमाते, मला आनंदी जीवनापासून दूर ठेवणारे शत्रू म्हणजे माझे दोष आहेत, याची मला जाणीवराहू दे आणि त्यांच्या निवारणासाठी माझ्याकडून सातत्याने अन् जाणीवपूर्वक प्रयत्न होऊ देत’, अशी तुझ्या चरणी प्रार्थनाआहे.

मित्रांनो, आपण देवीला दोष निवारण करण्याचे वचन देऊया आणि सर्वांनी यासाठी प्रयत्न करूया.

२ आ. नवरात्रीचे नंतरचे तीन दिवसमहालक्ष्मीदेवीची उपासना करण्यामागील शास्त्र :मित्रांनो, ही देवता आपल्यालासुख, शांती आणि समाधान प्रदान करते. यासाठी आपण महालक्ष्मीची उपासना करतो.

२ इ.नवरात्रीचे शेवटचे तीन दिवससरस्वतीदेवीची उपासना करण्यामागील शास्त्र

नमस्ते शारदे देवि वीणापुस्तकधारिणि ।
विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ॥

अर्थ : हाती वीणा आणि ग्रंथ धारण केलेल्या हे सरस्वती देवी तुला वंदन करून मी अभ्यासाला प्रारंभ करत आहे. तू माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा.

२ इ १. मुलांनो, विद्यार्थी हा ज्ञान आणि कला यांचा उपासक असल्याने सरस्वतीदेवीची उपासना करा :नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसांत सरस्वतीदेवीची शक्ती अधिक कार्यरत असल्याने आपण तिची उपासना करतो. मित्रांनो,सरस्वती म्हणजे कला आणि ज्ञान देणारी देवता आहे. या तीन दिवसांमध्ये आपण आपल्यातील गुण वाढवण्याचा प्रयत्नकरायला हवा; कारण गुणवृद्धी झाल्याविना ज्ञान आणि कला अवगत होणार नाहीत. यासाठी आपण या दिवसांत गुणसंवर्धनाचीप्रतिज्ञा करूया, तरच सरस्वतीमातेची आपल्यावर कृपा होईल. ही देवता विद्यार्थीदशेतील अत्यंत महत्त्वाची असल्यानेआपण या देवतेची प्रतिदिन शाळेत प्रार्थना करतो. विद्यार्थी हा ज्ञान आणि कला यांचा उपासक आहे.

२ इ २. सरस्वतीदेवीची शास्त्रीय माहिती : या देवतेची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यामध्ये पुढील गुण असावेत.

२ इ २ अ. शिकण्याची वृत्ती : मित्रांनो, जो सतत शिकण्याच्या स्थितीत असतो, त्याच्यावर सरस्वतीमाता प्रसन्न होते.आपल्याला सर्व विषयांचे ज्ञान नसते. आपल्यामध्ये इतरांकडून शिकण्याची वृत्ती असेल, तर आपण विविध व्यक्ती आणिवस्तू यांच्याकडून काहीतरी शिकू शकतो; कारण प्रत्येकात विविध गुण, ज्ञान आणि कला आहेत. आपल्या वर्गात काहीजणांचीचित्रकला चांगली असते, तर कुणाला चांगले गाणे येते. कुणाला गणित चांगले जमते. शिकण्याची वृत्ती अंगी असेल, तरआपल्या वर्गातील सर्व मुलांकडून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो.

२ इ २ आ. तीव्र तळमळ : ज्ञान आणि कला मिळवण्याची तीव्र तळमळ आपल्यामध्ये असायला हवी. मला कितीहीअडचणी आल्या, तरी मी ज्ञान मिळवणारच, अशी तळमळ आपल्यामध्ये यावी, यासाठी आपण सरस्वतीमातेला प्रार्थनाकरूया.

२ इ २ इ. मार्गदर्शन घेणे : ज्ञान आणि कला मिळवण्यासाठी आपण सतत तज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे.

२ इ २ ई. चिकाटी : एखादे ज्ञान आकलन होईपर्यंत सातत्याने प्रयत्न करत रहाणे, याला चिकाटी म्हणतात. काही मुलेएखादी गोष्ट जमली नाही की, लगेच सोडून देतात. आपल्याला कुठलीही गोष्ट ‘झटपट मिळायला हवी’, असे वाटते.मित्रांनो, कोणतेही ज्ञान मिळवण्यासाठी चिकाटी हवीच. या नवरात्रोत्सवाच्या कालावधीत हा गुण आपल्यामध्ये आणण्याचानिश्चय करूया.

२ इ २ उ. धर्माचरण : काही मुले अधिक गुण मिळवण्यासाठी दुसर्‍यांचे पाहून (‘कॉपी’) उत्तरे लिहितात. ही एकप्रकारची चोरीच असून तो अधर्म आहे. अशा विद्यार्थ्यांवर सरस्वती कधीच प्रसन्न होणार नाही. आपण धर्माचरण केले,तरच सरस्वतीमातेची कृपा होईल. हे सरस्वतीमाते, ‘माझ्याकहून सदोदित धर्माचरण होऊदे. माते, आजपासून आम्ही याविकृतीला नष्ट करण्याचा निश्चय करत आहोत’, अशी प्रार्थना करूया.

२ इ २ ऊ. विनम्रता : नम्रता असल्याविना आपण ज्ञान आणि कला ग्रहण करू शकत नाही. ‘विद्या विनयेन् शोभते’, असेम्हणतात. सरस्वतीदेवीला नम्र विद्यार्थी फार आवडतो. मित्रांनो, आपल्याला देवीचे आवडते व्हायचे आहे ना ? आपण हागुण अंगी बाणवण्याचा निश्चय करूया आणि आजपासून आपण नम्रतेने वागण्याची प्रतिज्ञा करूया.

२ इ २ ए. आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांना देणारा : मित्रांनो, आपल्याला एखादी कला किंवा ज्ञान मिळाले, तरते इतरांना देण्यातच खरा आनंद असतो. समर्थ रामदासांनी

‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी शिकवावे ।
शहाणे करूनीसोडावे, सकलजन ।’

असे म्हटले आहे. काही मुले इतरांना काहीच सांगत नाहीत. शिकवत नाहीत. याला स्वार्थी म्हणतात.असे विद्यार्थी सरस्वतीमातेला आवडत नाहीत.

मित्रांनो, आजपासून वरील सर्व गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करूया, तरच खर्‍या अर्थाने नवरात्रोत्सव साजराकेल्यासारखे होईल.

२ इ ३. श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची वैशिष्टये

२ इ ३ अ. मूर्तीचे चार हात : चार हात हे दिशांचे दर्शक आहेत आणि देवी सर्वव्यापी आहे, हे दर्शवतात.

२ इ ३ आ. हातात असलेले ग्रंथ : देवी ही ज्ञानप्राप्तीचे साधन आहे. तिच्या उपासनेने आपल्याला ज्ञानप्राप्ती होते.

२ इ ३ इ. हातातील जपमाळ : ही एकाग्रतेचे प्रतीक आहे. एकाग्रता असल्यास आपण ज्ञान लवकर ग्रहण करू शकतो.

२ इ ३ ई. वीणा : वीणा हे संगीतातील एक वाद्य आहे. संगीत ऐकल्यावर आपल्याला आनंद होतो आणि शांत वाटते.ज्ञानप्राप्ती झाल्यावर आपण आनंदी जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो.

२ इ ३ उ. देवीचे अनेक अलंकार : अलंकार हे ऐश्वर्याचे प्रतीक आहेत. देवीच्या उपासनेने आपल्याला ऐश्वर्य लाभते.

मित्रांनो, आज आपण सरस्वतीमातेची उपासना करण्यासाठी आवश्यक गुण पाहिले. सरस्वतीमातेने हातात घेतलेल्यावस्तूंचा अर्थ पाहिला. आपण ही सर्व माहिती इतरांनाही सांगूया. मुलांनो, आपल्याला अधिक माहितीसाठी ‘सनातन संस्थे’चा‘सरस्वती’, हा लघुग्रंथ वाचू शकता.

३. देवता आणि त्यांचे कार्य

अ. श्री महासरस्वती – सृष्टीनिर्मिती

आ. श्री महालक्ष्मी – पालनपोषण

इ. श्री महाकाली – संकटनिवारण आणि शत्रूचा नाश

४. देवीच्या पूजेमागील शास्त्र

४ अ. गंध : देवीला अनामिकेने गंध लावावे.

४ आ. देवता आणि त्याचे तत्त्व आकृष्ट करणारी फुले

श्री दुर्गादेवी मोगरा
श्री लक्ष्मी गुलाब
श्री सरस्वती रातराणी
श्री भवानी भुईकमळ
श्री अंबामाता पारिजात

१. देवीला फुले एक किंवा नऊच्या पटीत आणि गोलाकार वाहावीत.

२. देवीला मोगरा अत्तर लावावे.

३. देवीला एक किंवा नऊच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात.

४ इ. देवता आणि त्यांना आकृष्ट करणारे रंग

श्री दुर्गादेवी लाल
श्री लक्ष्मी पिवळा
श्री सरस्वती पांढरा
श्री कालीका जांभळा

४ ई. देवी अष्टभुजा असण्यामागील शास्त्र : अष्टभुजादेवीच्या हातात आयुधे असतात. अष्टभुजादेवी हे देवीचे मारकरूप आहे. ती अष्टदिशांचे रक्षण करणारी आहे.

४ उ. देवीकडे जोगवा मागणे : जोगवा मागणे, ही एक प्रकारची दास्यभक्ती आहे. यामध्ये देवीला शरण जाऊन स्वतःलाविसरता येते आणि आपला अहंकार न्यून होतो. ‘देवी, मी तुझा दास आहे’, असा भाव निर्माण होतो.

४ ऊ. देवीच्या अलंकारांचे महत्त्व : मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक स्त्री, ही देवीचे रूप आहे. देवीनेसर्व अलंकार परिधान केले आहेत. प्रत्येक अलंकारातून त्या स्त्रीला देवीची शक्ती मिळावी, देवीची कृपा सतत मिळावी, यासाठी देवीने स्त्रियांना अलंकाररूपी संरक्षककवच दिले आहे; मात्रसध्याआधुनिकतेच्या नावाखाली पुष्कळ मुली अलंकार घालत नाहीत.

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरूजी), पनवेल.

Leave a Comment